Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ जुलै, २०२६

*अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागात आषाढी वारी निमित्त* *दिंडी पालखी सोहळा संपन्न*

 *अकलूज-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागातजगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी आगमन सोहळा निमित्त दिंडी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



       याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर (माऊली) कदम , प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम तसेच सर्व इयत्ता प्रमुख उपस्थित होते.       


                                      प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते पालखी पूजन,प्रतिमापूजन,वारकरी सांप्रदायातील व अभिरूप पात्र साकारणाऱ्या  विठ्ठल-रुक्मिणी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत मुक्ताई, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा यांचे पूजन करण्यात आले   



        त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर (माऊली) कदम यांचा सन्मान प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम यांनी केला.



तद्नंतर प्रशालेतील विद्यार्थिनी कु.शताक्षी बोडके हिने "माझे माहेर पंढरी" हा अभंग गोड आवाजात सादर केला.प्रशालेतील सहशिक्षिका कु.थोरात मॅडम यांनी गवळण,अभंगाचे सादरीकरण केले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षिका यांच्या विठू नामाचा गजराने प्रशालेचा परिसर दुमदुमला.यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषेत उपस्थित होते.


           आषाढी वारी पालखी निमित्त स.मा.वि प्राथमिक शाळा - सदुभाऊ चौक - महावीर स्तंभ - गांधी चौक - महावीर स्तंभ - सदुभाऊ चौक - स.मा.वि प्राथमिक शाळा अशी पालखीची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी भालदार, चोपदार, पोलीस वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या दिंडी पालखी सोहळ्यात प्रशालेतील इयत्ता ३ री व ४ थी चे  विद्यार्थी व शिक्षक - शिक्षिका हरिनामाचा गजर करत सहभागी झाले होते.


         शेवटी प्रशालेच्या प्रांगणात अतिशय उत्साहाने गोल रिंगण सोहळा घेण्यात आला.त्यामध्ये प्रथम पताका,तुळस,टाळकरी, विणेकरी तसेच धाव,फुगड्या, अभंग,भजन करून विद्यार्थी व शिक्षकांनी रिंगणाचा आनंद घेतला शेवटी पालखीची आरती करून सोहळ्याची सांगता झाली.

 


    सदर पालखी सोहळ्यास प्रशालेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर वृंद,विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .मिसाळ सर यांनी

 केले

. छाया--कादर शेख , अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा