Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ जुलै, २०२६

अकलूज येथील जि.प.प्रा.शाळा मुले नंबर दोनव मुली नंबर तीन शाळेत बाल दिंडी पालखी सोहळा संपन्न

 *अकलूज-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


*साधूसंत येती घरा*

*तोची दिवाळी दसरा*

*ज्या गावात पालखी सोहळा असतो तेथे प्रती पंढरपूर अवतरते*


 अवघे मराठी मन भक्तीमय होऊन जाते. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर दोन व मुली नंबर तीन  या शाळेत आज बालदिंडी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताई, सोपानदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम या बालदिंडीत अवतरले आहेत असे वाटत होते. दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी व पालखीची पूजा करण्यात आली.या दिंडीमध्ये मुलांनी वारकरी वेश परिधान करून फेर धरला. विठ्ठलनामाचा गजर करत सर्व मुले व शिक्षक विठ्ठलमय होऊन गेले. विठ्ठल नामाच्या गजरात मुलांची बाल दिंडी शाळेपासून केंद्रशाळेपर्यंत  काढण्यात आली. या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी व आकर्षक सजवलेली पालखी आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले.केंद्र शाळेमध्ये विसावा घेण्यात आला. त्या ठिकाणी मुलांनी विठ्ठल नामाचा गजर करत झिम्मा फुगडीचाही फेर धरला. या पालखीमध्ये पालक वर्ग ही सहभागी झाला. मुलांना खाऊ देऊन दिंडीची सांगता करण्यात आली.    


         या दिंडीसाठी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुरज कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या दिंडीमध्ये मुले नंबर दोन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुकुमारी अंगुले मॅडम, श्रीमती बळवंतराव मॅडम,श्री तय्यब शेख सर, श्री दत्तात्रय गायकवाड सर,श्रीमती अंजली अडाणे मॅडम, श्रीमती फातिमा मुलाणी मॅडम, श्री. श्रीकांत राऊत सर, श्रीमती हजराबी बांगी मॅडम तसेच मुली तीन नंबर शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय कोरे सर, श्रीमती ललितागौरी राणे मॅडम,श्रीमती सुरय्या कोरबू मॅडम, श्रीमती रेखा कोळी मॅडम, श्री पांडुरंग मोहिते सर,श्रीमती वर्षाराणी जाधव मॅडम,श्री समीर कोरबू सर, श्रीमती करीना शेख मॅडम सर्वजण उपस्थित होते.


 अवघे मराठी मन भक्तीमय होऊन जाते. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर दोन व मुली नंबर तीन  या शाळेत आज बालदिंडी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताई, सोपानदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम या बालदिंडीत अवतरले आहेत असे वाटत होते. दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी व पालखीची पूजा करण्यात आली.या दिंडीमध्ये मुलांनी वारकरी वेश परिधान करून फेर धरला. विठ्ठलनामाचा गजर करत सर्व मुले व शिक्षक विठ्ठलमय होऊन गेले.       


                                         विठ्ठल नामाच्या गजरात मुलांची बाल दिंडी शाळेपासून केंद्रशाळेपर्यंत  काढण्यात आली. या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी व आकर्षक सजवलेली पालखी आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले.केंद्र शाळेमध्ये विसावा घेण्यात आला. त्या ठिकाणी मुलांनी विठ्ठल नामाचा गजर करत झिम्मा फुगडीचाही फेर धरला. या पालखीमध्ये पालक वर्ग ही सहभागी झाला. मुलांना खाऊ देऊन दिंडीची सांगता करण्यात आली. या दिंडीसाठी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुरज कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या दिंडीमध्ये मुले नंबर दोन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुकुमारी अंगुले मॅडम, श्रीमती बळवंतराव मॅडम,श्री तय्यब शेख सर, श्री दत्तात्रय गायकवाड सर,श्रीमती अंजली अडाणे मॅडम, श्रीमती फातिमा मुलाणी मॅडम, श्री. श्रीकांत राऊत सर, श्रीमती हजराबी बांगी मॅडम तसेच मुली तीन नंबर शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय कोरे सर, श्रीमती ललितागौरी राणे मॅडम,श्रीमती सुरय्या कोरबू मॅडम, श्रीमती रेखा कोळी मॅडम, श्री पांडुरंग मोहिते सर,श्रीमती वर्षाराणी जाधव मॅडम,श्री समीर कोरबू सर, श्रीमती करीना शेख मॅडम सर्वजण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा