इंदापूर, डॉ. संदेश शहा.
मंगळवार, १३ जुलै २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
देहू ते पंढरपूर मार्गावर जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचा रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचा
उपक्रम स्तुत्य व आदर्श आहे असे प्रतिपादन तंजावरचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज विजयराजे भोसले यांनी केले.
पुणे सहकार नगर येथे तंजावरचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज विजयराजे भोसले व रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे अखिल भारतीय अध्यक्ष सुरेश कोते यांच्या शुभहस्ते वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आसरा फाउंडेशनच्या माध्यमातून हे शिबिर संपन्न झाले. यावेळी हजारो वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प प्रशांत महाराज मोरे देहुकर, आसरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल केदारी, रेड स्वस्तिकचे नॅशनल प्रोजेक्ट डायरेक्टर दीप पाटील हे प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ. उमाकांत वाबळे, डॉ. बबन डोळस, डॉ. संतोष सुपे, उद्योजक मारुती भंडारी, सचिव कमलेश राक्षे, पुणे जिल्ह्याचे मा. सेक्रेटरी जयसिंगराव पवार, मा. डेप्युटी डायरेक्टर डॉ. दत्ता खुणे, डॉ. शिरोडकर, डॉ. ठाकरे, डॉ. काशिद, डॉ. मेहरे, डॉ. पवार, नितीन करंदीकर, उद्योजक सचिन कचरे, हभप श्रीकांत माळी महाराज, यांनी शिबिर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया चे प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष राजगुरू यांनी सूत्रसंचालन केले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना संतोष राजगुरू म्हणाले, रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष, मॅनेजिंग डायरेक्टर, मा. पोलीस महासंचालक डॉ. टी. एस. भाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर आरोग्य सेवा गरजू व गरीबांना पुरवली जाते. जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून रेड स्वस्तिकच्या माध्यमातून देहु ते पंढरपूर मार्गावर किमान ५० हजार हून जास्त वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे.
वारी मधील या वैद्यकीय पथकामध्ये संतोष राजगुरू, जयसिंगराव पवार, डॉ, दत्ता खुणे, वसंत गायकवाड, बापूसो माने, श्यामराव सावंत, राजू बेडगे, शामराव उकिरे, गजानन गोरे, सतीश नेतकर, अभिजीत बेलेकर, रेखा गोरे हे सहभागी आहेत.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा