*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
प्रतिनिधी अकलूज:
"अकलाई स्मशानभूमी शेजारी असलेले घनकचरा डम्पिंग ग्राउंडसमोरील (ठवरे प्लॉट) नागरिक वसाहतीमधील नागरिकांना माणूस म्हणून स्वच्छ मोकळा श्वास घेऊ द्या. येथील डम्पिंग ग्राउंडमुळे मानवी हक्कांचे उघड उल्लंघन होत असून, प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी," अशी तीव्र मागणी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डम्पिंग ग्राउंड की रहिवासी वसाहत? पाहुणेही चक्रावतात ठवरे प्लॉट परिसरातील सद्यस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. बेकायदेशीर कचरा डेपो आणि तिथे साठणारा कचरा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातचकाही अज्ञात व्यक्तींकडून या कचऱ्याला आग लावून दिली जाते.या आगीमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात विषारी धूर आणि प्लास्टिक प्रदूषण पसरत आहे. येथील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की, "नागरिकांची घरे डम्पिंग ग्राउंडमध्ये आहेत की डम्पिंग ग्राउंड नागरिकांच्या घरात आहे?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. नातेवाईक किंवा परगावचे पाहुणे आल्यास येथील दुर्गंधी आणि प्रदूषण पाहून नक्की कुठे आलोय, असा संभ्रम त्यांना पडतो.आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न
सध्या आषाढी वारीचे दिवस असून या परिसरातून मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक ये-जा करत असतात. या कचरा डेपोमुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वारीच्या आणि भाविकांच्या सुविधेसाठी तसेच स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यासाठी येथील (काटेरी) झाडे जेसीबीच्या साहाय्याने तात्काळ काढून संपूर्ण परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाई कुंभारे (नागपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी उप मुख्यधिकारी जयसिंगराव खुळे यांच्या कडे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित जतिन वायदंडे उपस्थित होते.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि मानवी हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा