Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

*आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याविरोधात माळशिरसमध्ये तीव्र संताप;* *गाढवाच्या गळ्यात आ.खोत यांचा फोटो अडकवून 'महाराष्ट्र विकास सेना' चे आक्रमक आंदोलन !*

 *अकलूज --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'नक्षलवादी' आणि 'आतंकवादी' म्हणणारे भाजपचे मित्रपक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.या बेजबाबदार वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यासाठी माळशिरस येथे 'महाराष्ट्र विकास सेना' पक्षाच्या वतीने अत्यंत आक्रमक आणि अनोखे आंदोलन करण्यात आले.

 


      महाराष्ट्र विकास सेनेचे प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट एक गाढव आणून त्याच्या गळ्यात आमदार सदाभाऊ खोत यांचा फोटो बांधला आणि आ.खोत यांच्या विरोधात निषेधाच्या तीव्र घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला."विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा धिक्कार असो", "सदाभाऊ खोत यांचे करायचे काय,खाली डोके वर पाय" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर डोक्यावर घेतला होता.

               या आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) माळशिरस यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना एक कडक इशारा देणारे निषेधाचे निवेदन पाठवण्यात आले.सदर निवेदन नायब तहसीलदार एस. एस. चंदनशिवे यांनी स्वीकारले.या निवेदनात आमदार सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी,अन्यथा यापुढील आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे. या धडक आंदोलनात महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे,सरचिटणीस सतीश साठे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे यांच्यासह मधुकर साठे,देविदास भुजबळ,शंकर साठे,मारुती साठे, रफिक मुलाणी,महेश साठे, दत्तात्रय वाघमारे,विशाल साठे, लिमराज सकट,बंडू कांबळे, महादेव साठे,कृष्णा खवळे, विशाल खंडागळे,शुभम साठे, रोहित पवार,मनोहर साठे,अजित खवळे,बबलू खवळे,राणबा साठे, मारुती साठे,शंकर साठे,चेतन साठे,विनायक रणदिवे,सुमित कांबळे,ज्ञानेश्वर लोखंडे किरण खंडागळे,साधू जाधव आणि पक्षाचे शेकडो आक्रमक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा