Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ जुलै, २०२६

जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात चोख, उत्तम प्रकारचा पोलिस बंदोबस्तामुळे अनुचित प्रकाराला आळा - जिल्हा पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल


 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


         जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात चांगला, उत्तम प्रकारचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे कोणत्याही अनुचित प्रकार घडला नसल्याचे कौतुक जिल्हा पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल यांनी केले.


     सराटी (ता.इंदापूर) येथून तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला निरोप दिल्यानंतर बंदोबस्तातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या सन्मान प्रसंगी संदिपसिंह गिल बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, मधूकर भटे, पोलिस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके आदि मान्यवर उपस्थित होते.


    संदिपसिंह गिल पुढे म्हणाले, तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी थेऊर फाटा ते सराटी पर्यंतचा वारकऱ्यांच्या सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उत्तम प्रकारे हाताळला ही बाब अभिमानाची आहे. मागील पंधरा दिवसांपासून घरदार सोडून सेवाभावाच्या दृष्टीकोनातून वारकऱ्यांचा बंदोबस्त कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू न देता केल्याने कामाचे कौतुक आहे. यापुढे यापेक्षा अधिकचे चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील रहावे.

    यावेळी तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी पुणे विभागातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, हवालदार, अंमलदार, पोलिस व होमगार्ड यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    यावेळी सराटी ग्रामपंचायत वतीने समीर तांबोळी, उपसरपंच संतोष कोकाटे, अमर भैय्या जगदाळे आदिंच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व हार देवून सन्मान करण्यात आला. 

फोटो - सराटी येथील पालखी तळावर बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा