Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ जुलै, २०२६

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बावडा येथील जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


       -महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, इंदापूर विधानसभा यांच्या वतीने बावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी शाळेतील लहान विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि इतर शालेय उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.

​भाजपने वाढदिवसानिमित्त होर्डिंग्स व अनावश्यक जाहिरातबाजी न करण्याचे आवाहन केले होते. पक्षाच्या या शिस्तीचे पालन करत, जाहिरातीचा खर्च टाळून लहान मुलांच्या शिक्षणाला मदत करून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने व उपक्रमशीलतेने साजरा करण्यात आला.

​या वेळी भाजप किसान मोर्चाचे इंदापूर विधानसभा अध्यक्ष अभिजीत घोगरे, विजय बापू घोगरे, अरुण बापू घोगरे, दादा कवडे, नागेश गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा