Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ जुलै, २०२६

*विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेज च्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेत* *अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याचे वाटप*

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*

*मंगळवार, २२ जुलै २६*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*


संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या आय एसटीई विद्यार्थी शाखेच्या वतीने फळे, बिस्किटे आणि पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले.

महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीच्या परंपरेचा भाग म्हणून दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा सेवाभावी उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला. मुख्य पालखी मार्गावर सुयोग्य नियोजन करून वारकऱ्यांना अल्पोपहार व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सेवाभावाचे दर्शन घडविले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण उपक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.

या उपक्रमामुळे वारकऱ्यांना प्रवासादरम्यान आवश्यक अल्पोपहार व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक उत्तरदायित्व, सेवाभाव, संघभावना आणि नागरिक म्हणून कर्तव्याची जाणीव अधिक दृढ झाली. समाजाशी महाविद्यालयाचे नाते अधिक बळकट करणारा हा उपक्रम उपस्थितांकडून आणि वारकऱ्यांकडून कौतुकास पात्र ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा