Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ११ जुलै, २०२६

आनंद दरबार प्रांगणात वारकऱ्यांचे रंगले भारुड, विठ्ठल नामाच्या जयघोषाबरोबरच झाला जय आनंद चा गजर.

 पुणे, डॉ. संदेश शहा.

दि. १० जुलै २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९


श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी  निघालेल्या दिंड्यांचे पुणे कात्रज येथील आनंद दरबार मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम बरोबरच जय आनंद चा जयघोष करण्यात आला.


 "साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा" या अभंगाची अनुभूती देणारा हा सोहळा सर्वांना आध्यात्मिक पर्वणी ठरला.

यावेळी भैरवनाथ कृपानाद दिंडी ( तळिये ), ह.भ.प. मृदंगविशारद हरिदास

महाराज पांचाळ ( वडवणी सोन्नाखोटा ) यांच्या दिंडीसह ह.भ.प. नामदेव महाराज गेवराईकर यांच्या दिंडीचे आनंद दरबारमध्ये आगमन झाले. टाळ-मृदंगाच्या निनादात, विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात आणि अखंड हरिनाम संकीर्तनाने संपूर्ण दत्तनगर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारूड मंडळाचे  चंद्रकात बाजे महाराज यांच्या आध्यात्मिक भारुडास उपस्थितांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. आदर्श गाव चिकनेर  याच्या वतीने आनंद दरबार कात्रज येथे हा एकनाथी भारूडाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आनंद दरबार




अध्यक्ष बाळासाहेब धोका, ह. भ. प प्रमोदजी चव्हाण महाराज, दत्तात्रय देशमुख महाराज, भैरवनाथ महाराज दिंडी तलिये ( जिल्हा  सातारा ) हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

दिंड्यांचे स्वागत आनंद

दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका, देवीदास जाधव, पांडुरंग नांदे, दत्तात्रय देशमुख आणि सारिका चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी तसेच दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाष पिरगळ, प्रकाश भटेवरा, संतोष भंडारी, संतोष दुगड, दिलीप संचेती, सविता बाबर, संतोष निगडे, सुभाष लूनावत, प्रमोद रांका, राहुल शहा, योगेंद्र रनवीर तसेच आनंद दरबारच्या सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा