*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळाचे अकलूज येथे आगमन होते तसेच संत श्री सोपान काका व संत श्री चांगवटेश्वर. तसेच इतर संताच्या ही पालख्यांचे आगमन होते. व अकलूज शहरमध्ये मध्ये मुक्कामी असतात.
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय येथे संत श्री तुकाराम महाराज या पालखी चा मुक्काम असतो व संत श्री सोपान काका पालखी चा मुक्काम विठ्ठल मंदिर येथे असतो व संत श्री चांगवटेश्वर पालखी चा मुक्काम मारुती मंदिरात असतो या प्रमुख पालख्या असतात.
अकलूज सराटी पूल येथे आगमन होते तेथे जिल्हा प्रशासना मार्फत स्वागत होते तेथून पुढे गांधी चौक येथे अकलूज नगरपरिषद मार्फत स्वागत केले जाते त्या नंतर विजय चौक मार्गे संभाजी चीक (किल्ला रोड) पासून अकलूज नगरपरिषद कार्यालयपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते आझाद चौक या अकलूज नगरपरिषद च्या ताब्यात असणाऱ्या मार्गाने सदाशिवराव माने विद्यालय जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी येथे मुक्कामी असते
पालखी सोहळ्या करिता खालील प्रमाणे व्यवस्था करण्यात येते
* पाणी पुरवठा व्यवस्था
> नगरपरिषदे मार्फत अकलूज शहरामध्ये दैनंदिन पाणीपुरवठा करणे करिता उपलब्ध असलेले उंच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या मधून पालखी सोहळा कालावधीत २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे एका दिवसामध्ये 6 MLD. पाणीपुरवठा केला जातो
> नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा करिता उपलब्ध असलेले शहरातील सर्व उंच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वछ करून घेण्यात आल्या आहेत. नगरपरिषदेच्या एकूण २४ सार्वजनिक बोअरवेल मार्फत पाणीपुरवठा केला जाणार असून ०१ सार्वजनिक विहीर मार्फत पाणी पुरवठा केला जातो
> शहरामध्ये वारकऱ्यांकरिता त्यांना दिंडी मुक्काम ठिकाणी नगरपरिषेचे ०४ आणि भाडेतत्वावर ०२ असे एकूण ०६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो
> पालखी सोहळ्या सोबत असणारे पिण्याचे पाणी टँकर फीडिंग साठी १) बहुउद्देशीय सभागृह २) जुने पोलिस स्टेशन ३) अकलाई देवी मंदिर ४) विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल या ठिकाणी वापराचे पाणी आणि १) माळेवाडी येथील तोरस्कर वस्ती २) काळा ओढा या ठिकाणी पिण्याचे पाणी असे ०६ ठिकाणे
निश्चित करण्यात आले आहेत.
> संपूर्ण शहरातील हातपंप व विहीरीमध्ये नगरपरिषदे मार्फत टि.सी.एल. योग्य त्या प्रमाणात टाकले जाते. पालखी सोहळा काळामध्ये भाविकांना पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याकरिता पॉइंटच्या ठिकाणी मुरूम व लाईटची व्यवस्था करण्यात येत असते
* पालखी स्वागत व्यवस्था
> पालखी स्वागता करिता सराटी पूल येथील ठिकाणी मंडप उभारण्यात येणार असून अकलूज नगरपरिषद हद्दीतील पालखी मार्गावर गर्दीच्या ठिकाणी कोणतीही वाहने जाऊ नयेत म्हणून वाहनांना प्रवेश बंध करणे करिता काही ठिकाणी लोखंडी सुरक्षा बरगेटिंग तर काही ठिकाणी जमिनीत गाडलेले पक्के बरगेटिंग ची सुविधा करणेचे नियोजन करण्यात येत असते
> पालखी मार्गावरती पालखी सोहळ्यास अडथळा करणारे झाडाचे फांद्या छाटण्याचे काम अकलूज नगरपरिषदे मार्फत पूर्ण करण्यात आले आहे. पालखी मार्गावरती असणारे रस्त्याचे खड्डे बुजविन्याचे काम पूर्ण झाले असून तसेच पालखी मुक्काम ठिकाणी व दिडी मुक्काम ठिकाणी चिखल होऊ नये म्हणून सदाशिवराव माने विद्यालय येथील पालखी तळावर मुरमीकरण सपाटीकरण करण्यात येत असते
> पालखी रिंगण सोहळा साठी सदाशिवराव माने विधालय येथे गोल रिंगण सोहळ्या करिता लाकडी बरगेटिंग व मंडप याची सुविधा करण्याचे नियोजन करण्यात येते.
दिवाबत्तीची व्यवस्था
> पालखी मार्गावरती असणारे व अकलूज शहरातील विविध ठिकाणी असणारे स्ट्रीट लाईट पोल वरती लाईटची सुविधा तसेच धोकादायक वायरीचे बंदोवस्त करण्याचे काम दिवाबत्ती विभागामार्फत करण्यात येत असते
> पालखी तळावर दिवाबत्तीची सुविधा तसेच सोहळ्या समवेत असणाऱ्या दिंडी मुक्काम ठिकाणी दिवाचत्तीची सुविधा करण्यात आली असून. शहरामधील १४ ठिकाणी फिरते शौचालयाच्या ठिकाणी लाइट कनेक्शन देणेची व दिवाबत्तीची सुविधा करण्यात येत असते
* म्वच्छता व आरोग्य
> पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकलूज शहरातील असणारे सर्व नाले, गटारी स्वच्छ करण्याचे काम घेण्यात येते. तसेच शहरात सर्वत्र बंतु नाशक फवारणी करण्यात आली आहे. निर्मल वारी करण्याच्या दृष्टीने पालखी सोहळा आगमनापूर्वी तसेच प्रस्थाना नंतर शहरामध्ये आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या २० घंटागाड्या मार्फत शहरातील स्वछतेवर नियंत्रण ठेवण्यात येट असते.
> अकलूज नगरपरिषदेचे शहरामध्ये एकूण १८ ठिकाणी एकूण २१० सार्वजनिक शौचालयाचे सीट असून सुलभइंटरनॅशनल शौचालयाचे बहुउद्देशीय सभागृह येथे २० आणि नवीन बाजारतळ येथे ४० सीट बांधून तयार आहेत. पालखी सोहळा मध्ये त्याचा वापर करण्यात येतो.
> पालखी तळ व एकूण १३ दिंडी मुक्काम ठिकाणी फिरते शौचालय ठेवण्याचे व त्यासाठी लागणारे पाणी, व दिवाबत्तीची सुविधा करणे तसेच स्वच्छता ठेवणे इत्यादीचे नियोजन करण्यात आले आहे प्रत्येक ठिकाणावर देखरेख करण्याकरिता नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याऱ्यांची नेमणूक करण्यात येत असते
फिरते शौचालय ठिकाण
फिरते शौचालय ठिकाणे युनिट ची संख्या
अकलूज शहर
१)सदाशिवराव माने विद्यालय १००
२)शंकरराव मोहिते महाविद्यालय माळेवाडी १००
३) कृषी उत्त्पन्न बाजार समिती १००
४) नवीन बाजार तळ ५०
५) विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल--१००
६) M.T. D. C.--५०
७) नामदेव मंगल कार्यालय-१००
८) मसूद मळा--१००
९)अकलाई देवी मंदिर-५०
१०) बहुउद्देशीय सभागृह--५०
११) पाटीदार भवन--५०
१२) शिवरत्न मोटर्स--५०
१३)सावतामाळी नगर माळेवाडी--५०
१४) सराटी नदी बाजूला--५०
१५) संत नरहरी नगर--५०
१६) मुस्लीम कब्रस्थान समोर-५०
१७) प्रतापसिंह चौक पुढील बाजूस-५०
१८) उदयरत्न टाउन शिप--५०
असे एकूण १२०० शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे
* महिला करिता अंघोळीची सुविधा
(फिरते शौचालय ठिकाणे
अकलूज शहर)
१) कृषी उत्त्पन्न बाजार समिती
२) विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल
३)बुद्धविहार
४) अकलाई देवी मंदिर
५)नवीन बाजार तळ
( अंघोळीसाठी लागणारे पाणी, व दिवाबत्तीची सुविधा करणे तसेच स्वच्छता ठेवणे इत्यादीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणावर देखरेख करण्याकरिता नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत असते.)
पालखी तळावरील सुविधा पालखी सोहळा मुक्काम ठिकाणी आपत्कालीन कक्ष, चौकशी कक्ष, आरोग्यकक्ष तसेच हिरकणी कक्ष नगरपरिषद मार्फत उभारण्याचे काम करण्यात येत असते.
तसेच शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालखी तळा वरती तसेच शहरामध्ये एकूण 92 ठिकाणीं सी.सी. टीव्ही ची करडी नजर असणार आहे. शहरातील मुख्य चौकामध्ये असणाऱ्या स्पीकर द्वारे भाविकांना आवाहन करण्यात येत असते.
पालखी रिंगण सोहळ्या करिता गोल बांबूचे बेरेगेटिंग तयार करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मुख्य चौकामध्ये पिण्याची पाणी, वापराचे पाणी टँकर फीडिंग ठिकाण तसेच चौकशी कक्ष, फिरते शौचालय ठिकाण, अंघोळीची सुविधा ठिकाणची माहिती दर्शवणारे डिजिटल बोर्ड (नकाशे पालखी) लावण्यात येत असतात.
अकलूज शहरामध्ये पालखी मार्गावर खालील कामाची आवश्यकता आहे
अ.क्र.
कामाचे नाव
१)अकलूज नगरपरिषद हद्दीतील गांधी चौक ते सदभाऊ चौक ते प्रतापसिंह चौक या रस्त्यावरील दुभाजकामध्ये येथील कायमस्वरूपी वारकऱ्याचे पूर्णाकृती पुतळे बसविणे.
२)अकलूज नगरपरिषद येथील सदाशिवराव माने विद्यालय मुक्कामाच्या ठिकाणी कायमस्वरूपी २ ठिकाणी हायमास्ट बसविणे.
३)अकलूज नगरपरिषद हद्दीतील गांधी चौक ते सदभाऊ चौक ते प्रतापसिंह चौक या रस्त्यावरील दुभाजकामध्ये येथील कायमस्वरूपी विद्युत रोषणाई व प्रकाश व्यवस्था करणे.
४) अकलूज नगरपरिषद हद्दीतील फिरते शौचालय ठिकाणे, महिला करिता अंघोळीची ठिकाणी व पालखी तळावर मुरुमीकरण करणे.n
५) अकलूज नगरपरिषद हद्दीतील फिरते शौचालय ठिकाणे, महिला करिता अंघोळीची ठिकाणी व पालखी तळावर प्रकाश व्यवस्था करणे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा