Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १० जुलै, २०२६

*रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या अध्यक्षपदी भीमाशंकर जाधव तर सचिवपदी उदय शहा यांची निवड, नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ दिमाखात संपन्न*

 **डॉ. संदेश शहा*

*दिनांक १० जुलै २६*

*टाईम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*



रोटरी क्लब ऑफ  इंदापूरचा सन २०२६ -२०२७ चा पदग्रहण समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या अध्यक्षपदी रो. भीमाशंकर जाधव, सचिवपदी रो. उदय शहा तर खजिनदार पदी रो. सुहास राऊत यांची तसेच नूतन कार्यकारणीची निवड झाली. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नितीन ढमाले होते. यावेळी असिस्टंट गव्हर्नर रो. रणजित भोंगळे, रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष रो.  प्रदीप गारटकर, मावळते अध्यक्ष रो. नितीन शहा, खजिनदार रो. मनोहर बेद्रे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नितीन ढमाले म्हणाले, रोटरी ही आंतरराष्ट्रीय समाजसेवी संघटना असून रोटरी डिस्ट्रिक्ट मध्ये इंदापूर रोटरी क्लबचे कार्य चांगले आहे. यावेळी त्यांनी रोटरीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कार्याची माहिती दिली.



इंदापूर रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, रोटरी क्लब ही राजकारणा पलीकडे जाऊन कार्य करणारी सामाजिक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या माध्यमातून सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करून मोठे कार्य करता येते. पोलिओ निर्मूलनात रोटरीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.





नवनिर्वाचित अध्यक्ष भीमाशंकर जाधव यांनी पुढील वर्षातील उद्दिष्टे आणी प्रकल्प याची सविस्तर माहिती दिली.

यावेळी इंदापूर रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष नितीन शहा यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात झालेल्या कार्याचा आढावा सादर केला.   कार्यक्रम यशस्वीतेसाठी रो. वसंतराव माळुंजकर, रो. नरेंद्र गांधी, रो. संजय दोशी, रो. आझाद पटेल, रो. नंदकुमार गुजर, रो. पारसमाल बागरेचा, रो. प्रमोद भंडारी, रो. पद्मसिंह जाधव, रो. अमर गायकवाड, रो. दीपक झालटे पाटील, रो. धरमचंद लोढा, रो. डॉ. यतीन शिंदे, रो. दत्तात्रय व्यवहारे, रो. राजेंद्र जगताप, रो. अजिंक्य इजगुडे, रो. डॉ. सचिन तोरवे, रो. सुरेश मोरे, रो. प्रशांत घुले, रो. राकेश गानबोटे, रो. संदीप वाशिंबेकर, रो. संजय बानकर यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा