*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालय टेंभूर्णी व इतर शाखा यांचेवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शासनमान्य महाराष्ट्र जिल्हा परिषद अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटना यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर,शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर,अध्यक्ष अल्पसंख्यांक आयोग महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे केली आहे
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कीजयंतीनिमित्त जाहीर करण्यात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर आलेल्या राजपत्रित सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी माहिती असताना मुद्दाम व मा महात्मा फुले विद्यालय, टेंभूर्णी येथे 3 शाळा सुरू ठेवण्यात आल्याची बाब 3 गंभीर आणि निषेधार्ह आहे.
सार्वजनिक सुट्टीबाबत शासनाच्या निर्देशांचे पालन करणे ही संबंधित शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे. अशा पवित्र धार्मिक दिवसाच्या दिवशी शाळा सुरू ठेवणे ही मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी बाब असून, अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी संघटना, सोलापूर जिल्हा या कृतीचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करते.
सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित शाळा प्रशासनावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच
दि. २७/०८/२०२६ रोजीचे महात्मा फुले विद्यालय, टेंभूर्णी व इतर शाखेचे सि.सी.टी.व्ही. फुटेज प्रशासनाने ताब्यात घेऊन योग्यती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे
याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हजरत शेख सर, जिल्हा नेते मो. बा. शेख सर व महीबूब सवार सर, जिल्हा सरचिटणीस उम्मीद सय्यद सर, दक्षिण सोलापूर तालुका नेते इमरान शेख सर, चिक्कळी सर, सरफराज पटेल सर* आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र जिल्हा परिषद अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी संघटना —
कर्मचारी व समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव कटिबद्ध!
आपल नम्र,
सरचिटणीस
अध्यक्ष
प्रत माहितीसाठी सस्नेह रवानाः
१)मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर
२)शिक्षणाधिकारी (माध्य), जि.प. सोलापूर
३)अध्यक्ष अल्पसंख्यांक आयोग महाराष्ट्र राज्य
चौकट
देशातील सर्व जाती-धर्मांचा आदर करा ही संविधानाची शिकवण मुलांना शाळेतून दिली पाहिजे. ईद-ए-मिलाद ची सुट्टी रद्द करून शाळा भरवणे धार्मिक भेदभावास चालना देण्यासारखे कृत्य आहे. शिक्षक सेनेने याचा विरोध करून प्रशासनाकडे हस्तक्षेपाची मागणी केली परंतु तरीही शाळा सुरूच राहील. शासकीय सार्वजनिक सुट्ट्या रद्द करण्याचा अधिकार कोणत्याही शाळेला नाही. मनमानी करणाऱ्या शाळेवर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे.*"
*विजयकुमार गुंड*
*जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना* *सोलापूर*






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा