*करमाळा तालुका -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9850686360*
संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळा शनिवारी (दि. 18 ) सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात दुपारी दोन वाजता येणार असून रावगाव येथे चार वाजता पालखीचे आगमन होणार आहे त्यानंतर रावगाव मुक्कामी होऊन दुसऱ्या दिवशी दिनांक 19 रोजी सकाळी करमाळा येथे पालखी येणार आहे सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकऱ्यांसाठी सोयी असलेल्या व्यवस्था केली आहे. सोहळ्यासाठी जिल्ह्यातील रावगाव या ठिकाणी प्रशासनाने पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. रावगाव येथे शनिवारी दुपारी सोहळ्याचे स्वागत झाल्यानंतर सदरची पालखी करमाळा येथे येणार आहे चालू वर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने पालखी सोहळ्याकडे विशेष लक्ष दिले असून सोलापूरचे कर्तव्यवेक्षित जिल्हाधिकारी कार्तिकीयन यांनी देखील रावगाव या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन या पद्धतीने भव्य कमानी लावून पालखीचे स्वागत केले आहे याशिवाय जिल्हाधिकारी तहसीलदार तसेच प्रांत अधिकारी हे देखील पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी विशेष लक्ष देऊन आहे
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या वारकऱ्यांना विविध सेवा सुविधा देण्यात येणार असून यामध्ये मोफत फूट मसाज, मोफत केस कर्तनालय मोफत कपड्यांना इस्त्री, याशिवाय अन्नदान व मोफत चपलांची दुरुस्ती अशा वारकऱ्यांना सेवा सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे
वारकऱ्यांना आरोग्याच्या सोयी सुविधा प. पालखी मार्गावरील वारकऱ्यांना, दिवसाच्या सोयीसाठी दवाखाने व पाणी व्यवस्था प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली आहे
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी रावगाव ग्रामस्थ तसेच करमाळा तहसील प्रशासन जिल्हा परिषद प्रशासन जोरदार तयारी करीत असून वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती करमाळा तहसील प्रशासनाने यावेळी बोलताना दिली
--चौकट
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील रावगाव तालुका करमाळा येथे सायंकाळी चार वाजता आगमन होणार असून त्या दृष्टीने ग्रामस्थांनी हिंदू मुस्लिम एकोपा कायम अबाधित राहावा म्हणून ग्रामस्थांनी रावगाव गावातील मशिदीवर वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत रंगाची आकर्षण रोशनाई केली आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा