Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ जुलै, २०२६

*श्रीराम "मंदिर न्यास A- 376 शेवगांव" च्या "राम ईनाम" भूखंडावरील अनधिकृत बांधकाम प्रशासन हटविणार का ???* *नुकत्याच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या दिशा समिति च्या त्रैमासिक सभेत रामभक्तानी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

 *शेवगाव -तालुका प्रतिनिधी* 

 *अविनाश देशमुख*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


अहिल्यानगर जिल्ह्याचे  दिशा समितीचे अध्यक्ष मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे उपाध्यक्ष खा.  निलेशजी लंके आणि जिल्हाधिकारी मा. पंकज आशिया जिह्यातील सर्व प्रमुख सरकारी निमसरकारी महामंडळ आणि केंद्राच्या अखत्यारीतील सर्व विभाग प्रमुख आणि  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती                                                                       


 त्यात शेवगांवच्या श्रीराम मंदिर न्यास च्या अनधिकृत बांधकाम पाडण्या संदर्भात 03 मार्च 2020 च्या तत्कालीन  उपविभागीय अधिकारी तथा  प्रांताधिकारी पाथर्डी शेवगांव यांच्या आदेशाला तत्कालीन तहसीलदार शेवगांव मुख्याधिकारी नगरपरिषद शेवगांव व पोलीस निरीक्षक शेवगांव पोलीस स्टेशन यांनी गावातील काही राजकारणी गुंड प्रवुत्तीचे व्यापारी आणि सत्तेतल्या वजनदार पुढाऱ्यांकडुन  निर्माण करण्यात आलेले अडथळे दुर करण्यासाठी मा जिल्हाधिकारी पंकज आशियायांना पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष दत्ता फुंदे आणि रामभक्तांच्या सह्यानिशी राम ईनाम भूखंडावरील गट क्रमांक 1313 1314 व 1315 या सुमारे 32 एकर जागेवरील अनधिकृत बांधकाम त्वरित हटविण्या संधर्भात  निवेदन सादर केले. समितीचे अध्यक्ष खा. भाऊसाहेब वाकचौरे उपाध्यक्ष खा.  निलेशजी लंके यांनी गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी मा. पंकज आशिया  यांनी संबंधित महसुल च्या  अधिकाऱयांना कायदेशीर  कारवाई करण्याच्या  सुचना  दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा