Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १५ जुलै, २०२६

शेवगावच्या बहुचर्चित शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला भामटा बिगबुल साईनाथ कल्याण कवडे या आरोपीला मोठा झटका उच्च न्यायालयाकडून नियमित जामीन फेटाळला*

अविनाश देशमुख -शेवगांव*सामाजिक कार्यकर्ता* *पत्रकार--9960051755/9270442511



शेवगाव तालुक्यातील बहुचर्चित शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील आरोपी साईनाथ कल्याण कवडे याला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळून लावल्याने या चर्चित प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.


फिर्यादी अवधूत केदार यांनी स्वतःसह इतर गुंतवणूकदारांची सुमारे २ कोटी ६३ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. [ वास्तविक हि रक्कम शेकडो कोटी आणि फसवणूक झालेले हजारो लोक आहेत ] तक्रारीनुसार, आरोपीने आपल्या कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणावर रक्कम स्वीकारली. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा किंवा मूळ रक्कम न दिल्याने गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात भारतीय दंड संहिता तसेच एमपीआयडी (MPID) आणि बीयूडीएस (BUDS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने सादर कागदपत्रे आणि युक्तिवादाचा विचार करून, प्रथमदर्शनी गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच, अनेक गुंतवणूकदारांच्या आर्थिक हिताचा प्रश्न या प्रकरणाशी संबंधित असल्याने आणि आरोपांचे स्वरूप गंभीर असल्याने आरोपीला नियमित जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे मत नोंदवत जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

या निर्णयामुळे फसवणूक झाल्याचा दावा करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आता या बहुचर्चित प्रकरणाच्या पुढील न्यायालयीन सुनावणी आणि तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


*ताजा कलम*

साईनाथ कवडेच्या जीवावर आतापर्यंत त्याच खरकटं खाऊन मोठे झालेले देव पाण्यात ठेऊन त्यांचे "साई सर" भामटा केव्हा बाहेर येईल आणि त्यांचे अडकलेले पैसे कसे खटाखट मोजुन देईल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा