Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ जुलै, २०२६

*राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिकांच्या मागणी संदर्भात नोंदणी व मुद्रांक महानिदेश यांच्याबरोबर १५ जुलै रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक*

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


             राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनीकांच्या मागण्या संदर्भात विचार विनिमय करण्यासंदर्भात मुद्रांक व नोंदणी महानिदेशक यांच्याबरोबर बैठक आयोजित करून त्यावर योग्य ते निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना दिले आहे. त्यामुळे राज्यातील मुद्रांक विक्रेते व लेखणीकांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.

   महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची संघटनेचे राज्य प्रतिनिधीनी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन संघटनेच्या मागण्या लवकरात लवकर सोडवण्यासंदर्भात राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिदेश यांच्याबरोबर उद्या बुधवार 15 जुलै रोजी बैठक लावली आहे.

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनेच्या अडचणी वर मार्ग काढण्यासाठी राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिदेशक रविंद्रजी बिनवडे यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन करून तातडीने बैठक लावून सर्व प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचना केली. शासनाने मुद्रांक विक्रेते व लेखनिकांच्या प्रलंबित विविध मागण्या संदर्भात सकारात्मक धोरण अवलंबल्यामुळे राज्यातील मुद्रांक विक्रेते व लेखनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आभार व्यक्त केले जात आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा