*करमाळा तालुका -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9850686360*
करमाळा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील हे मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. तसेच विरोधी बाकावरील आमदार नसतानाही केवळ वैयक्तिक संबंध चांगले ठेऊन सत्ताधारी मंडळीकडून विकासकामासाठी निधी मिळवण्यात यशस्वी होत आहेत. ही बाब करमाळा तालुक्यातील पाटील गटाच्या विरोधकांना पचनी पडत नसल्यानेच विविध आंदोलनांच्या माध्यमातून आमदार महोदयांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून माजी आमदार संजयमामा शिंदे हे पडद्याआड राहून विविध आंदोलनांना खतपाणी घालत आहेत. वास्तविक पाहता त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरले पाहिजे होते. परंतु करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण दुषीत करुन आमदार नारायण आबा पाटील यांनी हाती घेतलेल्या कामांना आडकाठी आणण्यासाठीच ही खटाटोप सुरू आहे. या अगोदर उजनी बॅकवॉटर परिसरातील गाळपेर जमिनी अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांना नोटीसा काढल्या होत्या. त्यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी तात्काळ हि प्रक्रिया थांबवायला शासनास भाग पाडले. परंतु दरम्यान पश्चिम भागातील शिंदे समर्थकांनी विविध सभांचे नियोजन हाती घेऊन केवळ आमदार नारायण आबा पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे हि मंडळी कुठे गायब झाली हे माहित नाही. यानंतर वीजेसाठी सत्तेत असताना सुद्धा काही महायुतीचे काही कार्यकर्ते केवळ संजयमामा यांच्या सांगण्यावरून रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना बघायला मिळाले. मांगी तलावातुन पाणी नेण्यास पहिला विरोध आमदार नारायण आबा पाटील यांनी केला पण तरीही मांगी येथील आंदोलनात केवळ आमदार नारायण आबा पाटील यांच्या वर टिका करण्यात संजयमामा यांचे पदाधिकारी अग्रेसर होते. आदिनाथ कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेस तीन वेळा आमदार नारायण आबा पाटील यांनी विरोध केल्याने स्थगिती मिळवली. आदिनाथ विकला जाऊ नये यासाठी संचालक मंडळासह कामगार देखील कोर्टात गेले आहेत. आमदार नारायण आबा पाटील यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु संजयमामा शिंदे यांनी केलेले आदिनाथ विकला जाईल हे भाकीत खरे ठरावे म्हणून आता शिंदे समर्थक आंदोलने करत आहेत. वास्तविक पाहता आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू दिड वर्षात तब्बल चारशे कोटी रुपयांचा निधी करमाळा मतदार संघातील विकास कामासाठी प्राप्त झाला आहे. वीजेची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी तसेच वादळी वाऱ्याचा फटका बसलेल्या भागाना स्वतः आमदार नारायण आबा पाटील भेट देऊन शासकीय नुकसान भरपाई मिळवून देत आहेत. कुकडी, दहिगाव, सीना-माढा तसेच बोगदा आणि मांगी तलावातून खालील गावांना व्यवस्थित पाणी आवर्तन दिले जात आहेत. आमसभा, पाणी टंचाई पुर्व नियोजन बैठक, तसेच विविध खात्यांच्या आढावा बैठका घेऊन जनतेचे प्रश्न आमदार नारायण आबा पाटील थेटपणे सोडवत आहेत. पण तरीही माजी आमदार संजयमामा शिंदे हे आंदोलनाला प्रवृत करुन पडद्या आडुन स्पॉन्सरची भुमिका पार पाडत आहेत. याचा कसलाही परिणाम करमाळा तालुक्यातील विकास कामांवर होणार नसुन आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास सुरळीतपणे सुरू असल्याचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा