*उपसंपादक --नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
वादळाने मोडले खोड, तरी मातीचा धागा तुटला नाही,
जखमांनी भरला देह, तरी जगण्याचा दिवा विझला नाही.
निसर्ग रोज शिकवितो, तुटून पुन्हा पुन्हा फुलायचे असते,
अश्रूंना डोळ्यात ठेवूनही हसत हसत जगायचे असते.
तुटला जरी कणा, तरी जिद्द हरवायची नसते,
काट्यांच्या वाटेवरही पावलांना थांबवायचे नसते.
केळीच्या तुटलेल्या बुडक्यातून घड पुन्हा डोकावतो,
"संकट म्हणजे शेवट नाही" हा संदेश देऊन जातो.
वादळे झाडे मोडतात, पण मुळे मोडू शकत नाहीत,
जिद्दीच्या माणसांना संकटे हरवू शकत नाहीत.
पडणे हा शेवट नसतो, तो नव्या सुरुवातीचा क्षण असतो,
राखेतून पुन्हा उठणाऱ्यांचाच खरा इतिहास घडत असतो
तुटला जरी कणा, तरी हार मानायची नसते,
कारण पडून पुन्हा उठण्यातच जीवनाची ताकद असते.
लेखिका 👆
नूरजहाँ फकृद्दिन शेख
गणेशगाव






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा