*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि एस एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2026 महिला सक्षमीकरण वर्ष साजरे केले जाणार आहे .शेती आणि शेतीपूरक काम करणाऱ्या महिलांना कायदेशीर ओळख देणे व त्यासाठी त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देणे हा या महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम - 2026 मुख्य उद्देश आहे व त्यासाठी हा कायदा पारित करण्यात आलेला आहे .यामुळे महिला व पुरुष समान संधी मिळेल यामुळे या महिलांना सरकारी योजना बँक कर्ज अनुदान विमा आणि मार्गदर्शन याचा फायदा घेता येणार आहे या नवीन नियमामुळे यापूर्वीच्या प्रचलित महिला संबंधी योजना बंद होणार नाहीत किंवा त्यात बदल होणार नाही .महिलांना पुरुष शेतकऱ्याप्रमाणे समान ओळख संधी व मदत मिळावी व शेती आधिक समावेश व्हावी व उत्पादन वाढावे आणि ग्रामीण भागातील जीवन अधिक सुरक्षित व्हावे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे .या योजनेचा अधिनियम अंतर्गत लाभार्थी होण्यासाठी महिला यांचे वय 18 वर्षे पेक्षा जास्त आहे आणि महिला शेतीचे किंवा शेतीपूरक कुठलंही काम करतात व जमीन त्यांच्या नावावर असेल किंवा नसेल तरी त्यांना या अधिनियम अंतर्गत महिला शेतकरी संबोधण्यात येणार आहे .या सदराखाली समाविष्ट होणाऱ्या सर्व महिला यांनी ऑनलाइन अर्ज ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत यांच्याकडे करावयाचा आहे किंवा त्यांनी जरी अर्ज नाही केला तरी त्यांचे पात्रता निकषानुसार त्यांना शेतकरी प्रमाणपत्र देण्याची निर्देश आहेत या योजनेसाठी पात्र महिलांनी ग्रामपंचायत व नगरपंचायत यांकडे ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे आलेल्या अर्जाचा सर्व ग्रामसभा विशेष ग्रामसभानगरपंचायत सभा समोर मांडून खतर जमा करून पात्र शेतकरी महिलांना मान्यता ठराव देऊन पंधरा दिवसाचे आत महिला शेतकरी प्रमाणपत्र द्यावयाचे आहे .या योजनेचा महिला शेतकऱ्यांना खालील प्रकारे लाभ घेता येईल १-शेतीसाठी आर्थिक मदत व योजना अनुदानासाठी २ -बियाणे खत व इतर शेती पूरक साहित्य पुरवठा करणाऱ्या योजनांसाठी ३ -शेती विषयी कर्ज विमा व मार्गदर्शन सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी ४ -शेतीमाल बाजारपेठ पर्यंत नेण्यासाठी वाहतूक साठवणूक व खरेदी विक्री संबंधीच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ५ -कौशल्य शिकणाऱ्या व स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या मदत कार्य कामासाठी . ६ - -विधवा घटस्फोटीत परित्यकता व आर्थिक / सामाजिक दृष्ट्या दुर्बल महिला शेतक्यांसाठी मदत कार्यक्रमासाठी ७ - राज्य शासन कर्ज धोरणांशी संबंधी सुविधासाठी . इत्यादी फायदा होईल . यासाठी मदत सल्ला मार्गदर्शन महिती साठी तालुका पातळीवर महिला शेतकरी सहाय्य अधिकारी यांची मदत घ्यावी व त्यासाठी पद निर्माण करण्यात आले आहे तरी महाराष्ट्र महिला शेतकरी अधिनियम २०२६ अंतर्गत बाबी लाभ तरतुद इत्यादी लाभ घेणेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.
सेवारत्न श्री सतिश शांताबाई कुंडलिक कचरे मंडळ कृषि अधिकारी अकलूज ISO9001:2015




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा