Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

*प्राथमिक शाळा क्र. ३, माळीनगर गट नं. २ येथे विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रंगला स्वातंत्र्यदिन सोहळा.*

 नूरजहाँ शेख - उपसंपादक

टाइम्स 45 न्युज मराठी


*माळीनगर :* प्राथमिक शाळा क्रमांक ३, माळीनगर गट नं. २ येथे भारताचा *८०वा स्वातंत्र्यदिन* अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि देशभक्तीमय वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. तिरंग्याच्या साक्षीने, देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी आणि विद्यार्थ्यांच्या मनमोहक कलाविष्काराने संपूर्ण शाळेचा परिसर भारावून गेला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *माननीय नाईक सुभेदार श्री. मारुती अण्णा निकम (सेवानिवृत्त आर्मी)* हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून *श्री. सूरज महादेव माने साहेब, बँक ऑफ इंडिया उपस्थित होते. यावेळी प्रगतशील श्री. जितेंद्र लांडगे, डॉ. संजय घोंगाणे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. मुकुंद मुंडफणे, सौ. कल्पना इनामके, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखाप्रमुख श्री. मुकुंद वजाळे साहेब, माजी शाखाप्रमुख श्री. प्रदीप नागटिळक साहेब* यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री. प्रवीण खरात सर व श्रीमती स्मिता म्हेत्रे मॅडम* यांनी अतिशय प्रभावीपणे केले. शाळेच्या कार्यकुशल *मुख्याध्यापिका सौ. नागटिळक मॅडम* यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त व राष्ट्रनिष्ठेची भावना निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या *देशभक्तीपर गीतांवरील नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली.* चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे वातावरणात देशभक्तीचा जोश निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कलाविष्काराला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

या कार्यक्रमासाठी *पालकवर्ग, ग्रामस्थ, विविध मंडळांचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.* स्थानिक मंडळे आणि पालकवर्गाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात खाऊवाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात आणखी भर पडली.

 पालक व ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप..

विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे नियोजन, शाळेची सजावट आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचे सुंदर सादरीकरण पाहून पालकवर्ग व ग्रामस्थांनी शाळेचे मनापासून कौतुक केले. *‘शिक्षणासोबत संस्कार आणि देशप्रेमाची जडणघडण’* या विचाराचा सुंदर प्रत्यय या कार्यक्रमातून आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *श्री. गोविंद काळे सर, श्री. वैजनाथ भोसले सर, सौ. उज्वला देवकाते मॅडम, श्रीमती वंदना बंडगर मॅडम, श्री. प्रवीण खरात सर, श्रीमती स्मिता म्हेत्रे मॅडम व सौ. गौरी शिंदे मॅडम* यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या *आदर्श, कार्यकुशल आणि विद्यार्थीकेंद्री मुख्याध्यापिका सौ. नागटिळक मॅडम* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 *“तिरंगा उंच फडकला, देशभक्तीचा रंग चढला;*

*विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने, माळीनगरचा परिसर दुमदुमला!”*

अशा उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय वातावरणात प्राथमिक शाळा क्र. ३, माळीनगर गट नं. २ येथे *८०वा स्वातंत्र्यदिन सोहळा संस्मरणीय ठरला.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा