*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आधार कार्ड अपडेटचे कामकाज सुरू झाले आहे. करमाळा व परिसरातील सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती
पोस्ट ऑफिसमध्ये आधार अपडेटसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार सेवा उपलब्ध आहे
आधार सेवा शुल्क :
• आधारमधील लोकसंख्याशास्त्रीय (Demographic) अपडेट – ₹75/-
(नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल इ.)
• बायोमेट्रिक अपडेट – ₹125/-
(फोटो, फिंगरप्रिंट, आयरिस अपडेट)
• लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेट (वय 5 ते 7 वर्षे व 15 ते 17 वर्षे) – नियमानुसार मोफत/लागू शुल्कानुसार.
नागरिकांनी आधार अपडेटसाठी अधिकृत केंद्रावरच जावे. काही ठिकाणी अनधिकृत आधार सेंटरकडून शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आढळतात. त्यामुळे नागरिकांनी अशा अतिरिक्त शुल्कापासून सावध राहावे व करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये योग्य दरात व विश्वासार्ह पद्धतीने आधार सेवा घ्यावी
आपली सेवा, आपले पोस्ट ऑफिस — करमाळा पोस्ट ऑफिस
सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा