Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

अतिरिक्त रासायनिक खतांमुळे पिकांबरोबरच आपल्याही आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जाणवू लागले - तालुका कृषी अधिकारी श्री गरगडे साहेब

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


           अतिरिक्त रासायनिक खतांमुळे पिकांबरोबरच आपल्याही आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जाणवू लागले आहेत असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी श्री गरगडे साहेब यांनी केले.


     मौजे चाकाटी येथे महिला शेतकरी बचत शेती शाळा वर्ग चौथा उत्साहात संपन्न झाला. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. गरगडे साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्रीमती खर्डे मॅडम, उपकृषी अधिकारी रामगुडे साहेब, श्री. पांढरे सर व मंडळामधील सर्व कृषी सहायक उपस्थित होते.             चाकाटीच्या सहाय्यक कृषी अधिकारी सौ अंजली अडसूळ मॅडम यांनी मागील वर्गाच्या अभिवाचन करून मका पीक पद्धत, बीबीएफ यंत्रा द्वारे पीक पेरणी, तसेच कृषी विभागाचे विविध योजनांची माहिती दिली. तसेच जैविक खतांमुळे मातीचे संवर्धन आणि मातीचा पोत सुधारण्यास कशी मदत होते, याबाबत शेतकऱ्यांना मोलाची माहिती देण्यात आली.

फोटो - चाकाटी येथे महिला शेतकरी बचत शेती शाळेत उपस्थित महिला व नागरिक दिसत आहेत.

-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा