*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा येथील नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्डूवाडी येथे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला
करमाळा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार कुर्डूवाडी येथे दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी श्री.ब्रिजपाल संभु वाल्मिकी उपाध्यक्ष, श्रीराम कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या संजय मामा शिंदे माजी आमदार करमाळा-माढा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुर्डूवाडी व करमाळा येथील नगरपरिषदेतील उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी यांचा संजय मामा शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, फेटा, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
करमाळा नगरपरिषदेतील कर्मचारी प्रदीप चौकटे, संतोष मंडलिक, योगेश कांबळे, सतीश खरात, विकास खरात, स्नेहल कांबळे, कौशल्या लोंढे इत्यादींचा सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ब्रिजपाल संभू वाल्मिकी यांनी करमाळा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना, मला मनापासून आनंद होत आहे. जो कर्मचारी प्रामाणिकपणे आपल्याला नेमून दिलेले काम वेळेवर करतो, कर्तव्य पार पाडतो, आपल्या कामावर निष्ठा ठेवतो, नागरिकांशी आदराने वागतो, नागरिकांचे मदतीला धावतो अशा कर्मचारी वर्गाचा सत्कार माझ्या हातून होत आहे. हे मी माझे भाग्य समजतो
करमाळा नगरपरिषदेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे म्हणजेच "जनसेवा हीच ईशसेवा" याप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या शहराची, गावाची आपल्या कामातून ओळख निर्माण करावी. तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार मी दरवर्षी संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार व भेटवस्तू देऊन करत असतो. हे माझे सलग चौथे वर्ष असून हे कार्य मी यापुढेही चालू ठेवणार आहे.
याप्रसंगी कुर्डवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे, उपनगराध्यक्षा सविताताई जगताप तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमासाठी इतर मान्यवर,पत्रकार, करमाळा नगरपरिषद कर्मचारी, कुर्डूवाडी नगरपरिषद कर्मचारी, कुर्डूवाडी शहरातील नागरिक व पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा