*मंगरुळ- प्रतिनिधी*
*चांदसाहेब शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील माजी पोलीस पाटील कमलाकर साठे यांचे रविवार ९ऑगस्ट रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्यांचा परिसरात जबरदस्त हातखंडा होता त्यांनी अनंत विषय सामोपचाराने मिटवून वेळोवेळी पोलिस प्रशासनाला सहकार्य केले होते लहान सहान तंटे गावपातळीवर मिटविण्यात तालुक्यात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जायचे आप्पा या आदरयुक्त टोपण नावाने त्यांना संबोधले जायचे त्यांच्यावर मंगरुळ येथिल त्यांच्या शेतात सायंकाळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने मंगरुळ व परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे
⭕ मंगरूळ येथील माजी पोलीस पाटील कैलासवासी कमलाकर रावसाहेब साठे पाटील"*टाइम्स 45 न्यूज मराठी*"परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली⭕




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा