Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; सहा महिन्यांपासून अश्लील कृत्ये. जिंतीच्या दोघांवर गुन्हा दाखल

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी


करमाळा : सहा महिन्यांपासून अश्लील कृत्ये करुन अल्पवयीन मुलींना त्रास दिल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील जिंती येथील दोघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पीडीतेचा पाठलाग करून निर्जन ठिकाणी अडवल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली आहे. याबाबत ५० वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.०७/०८/२६ रोजी सकाळी ९ वाजता पीडित निर्भया (बदललेले नाव) ही शाळेला जात असताना अशोक गायकवाड, आणि अविनाश पवार या दोघांनी तिचा पाठलाग केला. निर्जन ठिकाणी आल्यानंतर या दोघांनी तिला अडवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी पीडित निर्भयाने घरी सांगेन असे म्हटल्यानंतर त्यांनी तिला घडल्या प्रकाराबद्दल घरी सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन निर्भयाने याबाबत घरी सांगितल्यानंतर घरातील वयस्कर महिला गायकवाड आणि पवार यांना असे प्रकार न करण्याबाबत सांगण्यास गेली असताना गायकवाड आणि पवार यांनी या महिलेशी वाद घालून तिला ठार मारण्याची धमकी दिली. सदर आरोपी हे गेल्या सहा महिन्यांपासून पीडित निर्भयासह तिच्या लहान बहिणीला दुकानात येऊन साहित्य घेण्याच्या निमित्ताने अश्लील शब्दात बोलून अश्लील चाळे करत असल्याचेही या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी आरोपी अशोक गायकवाड (वय-४० वर्षे) आणि अविनाश पवार (वय-२६ वर्षे, दोघे रा. जिंती, ता. करमाळा, जि. सोलापुर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून स.पो.नि. बालाजी वळसणे हे या गुन्हयाचा अधिक तपास करत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा