*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा सोनाई डेअरी येथे उत्साहात संपन्न झाला. सोनाई डेअरीचे अध्यक्ष दशरथ दादा माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व संचालक मंडळ व सर्व विभागाचे प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सोनाई डेअरी येथे अध्यक्ष दशरथ दादा माने , कार्यकारी संचालक विष्णू कुमार माने, संचालक प्रविण भैय्या माने, किशोर भैय्या माने, वाहतूक विभागाचे व्यवस्थापक दिपक सातव, मार्केटिंग विभागाचे मारकड, सर्व विभागांचे प्रमुख, महिला व पुरुष कर्मचारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वाहन चालक तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सोनाई डेअरीच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेला झेंडा अध्यक्ष दशरथ दादा माने यांच्या हस्ते फडकवण्यात आला. त्यानंतर उपस्थिता समोर दशरथ दादा माने, विष्णू कुमार माने व प्रवीण भैय्या माने यांनी आपले अनमोल विचार मांडले.
फोटो - सोनाई डेअरी येथे देशाचा ८० वा स्वातंत्रता दिन सोहळा पार पडला.
.....................................................................






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा