Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी करमाळा बस स्थानकावरील ०६ तोळे ७ ग्रॅम सोने चोरी करणाऱ्या गुन्हयाची उकल तसेच करमाळा शहरातुन चोरीस गेलेल्या मोटार सायकल चोरास केले अटक असा एकुण १०,७०,००० रू किं मुद्देमाल केला जप्त

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*



करमाळा पोलीस स्टेशनने दमदार कामगिरी केली असून करमाळा बस स्थानकावरील ०६ तोळे ७ ग्रॅम सोने चोरी करणाऱ्या गुन्हयाची उकल तसेच करमाळा शहरातुन चोरीस गेलेल्या मोटार सायकल चोरास केले अटक असा एकुण १०,७०,००० रू किं मुद्देमाल केला जप्त करण्यात करमाळा पोलीस यशस्वी झाले आहेत 

घटना क्रमांक १

यात हकिगत अशी कि दि. ३०/०४/२०२६ रोजी सायंकाळी ०५/०० वा. चे सुमारास फिर्यादी नामे स्वाती धनंजय पुजारी वय ३२ वर्षे धंदा घरकाम, रा. अंकोली ता. मोहोळ जि. सोलापूर या करमाळा ते सोलापूर या बसनें दि.३०/०४/२०२६ रोजी सायंकाळी ०५/१५ वा चे सुमारास निघाले असता बसमध्ये चढल्यानंतर मी माझी पर्स चेक केली असता पर्स च्या सर्व चैन या उघडलेल्या दिसल्याने मी साहीत्य चेक केले असता मला ते दिसुन आले नाही हॅन्डपर्स मध्ये १) २५ ग्रॅम सोन्याचा राणी हार २) २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे घंटन ३) १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोकर ४) ०५ ग्रॅम वजनाचे कानातील झुबे टॉप असा एकुण १०,०५,०००/- रू कि चे सोन्याचे दागिने करमाळा बस स्टॅन्ड येथुन कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घवुन त्यांच्या हॅन्डपर्स हातातील घेवुन चोरी केली. त्याबाबत करमाळा पोलीस ठाणेस गु.र.नं. ३९३/२०२६, भा. न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे

करमाळा पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण येथे मागील काही दिवसापासून पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये व बसस्टॅन्ड वरचोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्ण (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस (भा.पो.से.), यांनी करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरनण शाखेच्या अंमलदारांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

त्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने व गुन्हे प्रकटीकरण पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषण व बस स्टॅन्डवरील सी.सी.टी. व्ही चे अवलोकनाच्या आधारे सदरचा गुन्हा हा महिला आरोपी नामे साधना जैण्या काळे वय २७ रा. बिडकीन ता. पैठन जि. छत्रपती संभाजीनगर हिने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी हिस कडे गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली असता तिने दागिने हे तिच्या घरामध्ये पेटीमध्ये ठेवले असले बाबत सांगितल्यानंतर आरोपीचे ताब्यातुन ते जप्त करण्यात आले त्याचे वर्णन खालीलप्रमाणे

१) २५ ग्रॅम सोन्याचा राणी हार

२) २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे घंटन

३)१० ग्रॅम वजनाचे सोन्याचा चोकर

४)०५ ग्रॅम वजनाचे कानातील झुबे टॉप

तरी असा एकुण १०,०५,०००रू किं. चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपासात सदरचा गुन्हा हा महिला आरोपी नामे साधना जैण्या काळे वय २७ रा. बिडकीन ता. पैठन जि. छत्रपती संभाजी हिने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. व सदर गुन्हयात महिला आरोपी नामे नामे साधना जैण्या काळे वय २७ रा. बिडकीन ता. पैठन जि. छत्रपती संभाजीनगर हिस अटक केली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ / १६८२ मोहोळकर हे करीत आहेत.

घटना क ०२

दि.०४/०८/२०२६ रोजी दुपारी ०१:०० चे सुमारास ओंकार सुभाष मारडकर यांची कसाब गल्ली येथे घराबाहेर लावलेली मोटार सायकल हि ०३:१५ मी बाहेर येउन पाहिले असता ती दिसुन न आल्याने तीचा आजुबाजुस व करमाळा शहरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. सदर मोटार सायकल चे वर्णन हे खालीलप्रमाणे ६५,००० रू किं एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल तीचा आरटीओ क MH 16 Z 9940 असा असुन तीचा चेसीस नंबर 06G16F21104 असा आहे तरी वरील वर्णनाची मोटार सायकल ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून घेवुन गेले बाबतचा करमाळा पोलीस ठाणेस गु.र.नं ६९८/२६ भा. न्याय.सं.३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.


त्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषण व सी.सी.टी.व्ही चे अवलोकनाच्या अधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे रावसाहेब उर्फ पप्पु पांडुरंग चव्हाण रा. सावडी ता. करमाळा जि. सोलापूर याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी कडे गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली असता त्याने सदरची मोटार सायकल ही सावडी गावातील पुलाखाली लपवली असले बाबत सांगितले असता ती जप्त करण्यात आले तरी एंकदरीत तपासावरून सदरचा गुन्हा हा आरोपी नामे नामे रावसाहेब उर्फ पप्पु पांडुरंग चव्हाण रा. सावडी ता. करमाळा जि. सोलापूर याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. व सदर गुन्हयात आरोपी नामे रावसाहेब उर्फ पप्पु पांडुरंग चव्हाण रा. सावडी ता. करमाळा जि. सोलापूर यास अटक केली आहे.


सदर गुन्हयाचा पुढील तपास हा पदवीधर पोकॉ/५९५ ईसामिया बहीरे हे करीत आहेत.


सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंजना कृष्णा व्ही.एस. (भा.पो.से), यांचे मार्गदर्शनाखाली, करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने, पोहेकॉ/१६८२ अभिजीत मोहोळकर, पोना /९१२ वैभव ठेंगल, पोकॉ/५९५ ईसामिया बहीरे, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/१५२४ अमोल रंदिल पोकॉ/६८९ योगेश येवले, पोकॉ/१२५९ गणेश शिंदे यांनी केली आहे.


सदरची बातमी आपले लोकप्रिय वृत्तपत्रात प्रसिदध होणेस विनंती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा