Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

*रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक संपन्न* *नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर.*

 *अकलूज प्रतिनिधी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो:-9730867448*


रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब व राष्ट्रीय युवा नेते ॲड.अमन आंबेडकर साहेब यांच्या सोलापूर-माढा लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज येथे उत्साहात पार पडली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश सचिव सोमनाथ अरुण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.



या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सचिव सोमनाथ अरुण भोसले यांच्या हस्ते सोलापूर-माढा लोकसभा तसेच माळशिरस व पंढरपूर तालुक्यांच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी बोलताना प्रदेश सचिव सोमनाथ भोसले यांनी सांगितले की, काही पदाधिकाऱ्यांनी अपेक्षित कार्य न केल्यामुळे पक्षाच्या बळकटीसाठी काही पदांमध्ये फेरबदल करून नव्या कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी व पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी करावा तसेच राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब व राष्ट्रीय नेते ऍड.अमन आबेडकर साहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष अधिक सक्षम करण्याचेही त्यांनी सांगितले.

नवीन नियुक्त्यांमध्ये सोलापूर-माढा लोकसभा जिल्हाध्यक्षपदी विश्वास उगाडे, सोलापूर माढा लोकसभा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निलम बनसोडे यांची निवड करण्यात आली.तसेच माळशिरस तालुकाध्यक्षपदी विकी लोंढे, युवक तालुका अध्यक्षपदी शिवाजी खडतरे, माळशिरस तालुका संघटकपदी दत्ता कांबळे,युवक तालुका संपर्कप्रमुख पदी शिवाजी गेजगे,महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी पुष्पाताई भडंगे,पंढरपूर तालुकाध्यक्षपदी गणेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अकलूज शहराध्यक्षपदी साजिद बागवान व शहर उपाध्यक्षपदी शहाजी खडतरे यांचीही निवड जाहीर करण्यात आली.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वास उगाडे यांनी आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, प्रदेश सचिव सोमनाथ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर-माढा लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात पक्षाची ताकद वाढवून संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला

या बैठकीस मोठ्या संख्येने पदाधिकारी व भीमसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा