*मुख्य संपादक*-
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो:-9730867448*
बार्शी येथील गाडेगाव रोडजवरील मदरसा ऐ सवालेहिन या ठिकाणी दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त ध्वजारोहण करून तिरंगा ध्वजाला सलामी देऊन उत्साहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉम्रेड तानाजी ठोंबरे सर होते तर बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे ए.पी.आय सोनवणे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला तसेच संस्थेचे सर्व सभासद, शिक्षक, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी यांच्या समवेत राष्ट्रगीताने ध्वजास सलामी देण्यात आली.
१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाबद्दल एपीआय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मराठी उर्दू इंग्रजी मध्ये स्वातंत्र्य च्या महत्वावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजीराव ठोंबरे सर यांनी विद्यार्थ्यांना साध्या सोप्या सरळ मराठी भाषेत मोलाचे मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच खरा इतिहास सांगितला. देशाच्या स्वतंत्र्यासाठी सर्वात प्रथम इंग्रजांच्या विरोधात अधिक प्रमाणात मुस्लिम उल्लेमानी बलिदान दिल्याची माहिती दिली. तसेच देशासाठी व आपल्या कुटुंबासाठी शिक्षण ही काळाची गरज असून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षणामुळे माणूस माणूस होतो. यावेळी देशासाठी मुस्लिम समाजातील योगदान बहुमोल असून असाउद्दीन खान, डॉक्टर झाकीर हुसेन, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर ए पी अब्दुल कलाम यांचे ही योगदान विसरता येणार नाही . तसेच समाजासाठी कुटुंबासाठी देशासाठी लहानपणी किती कष्टातून गरिबीतून मी शिक्षण घेतल्याची माहिती दिली व मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष रोहित रमेश पाटील, तलाठी ताहेर तांबोळी, नगरसेवक मुजमील पठाण, महेदी मिया लांडगे नगरसेवक ,मोहिते, इमाम लांडगे, उद्योजक रुपेश कांकरिया, डॉक्टर मौला शेख, धीरज भोसले , सादिक बासडे, जमील खान, मुजफ्फर येडशीकर, तोसीफ येडशीकर , युनूस शेख , वहाब येडशीकर, मुनवर पिंजारी, आरोग्य अधिकारी शब्बीर भाई वस्ताद, जुबेर भाई येडशीकर, मदरशाचे प्रमुख मुफ्तीअ. मुहिद कासमी, फोटोग्राफर सलमान भाई शेख, दिलावर इस्माईल बागवान, मो- आदम जाफर पठाण,विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमील खान यांनी केले. सर्वांसाठी मदरशाचे वतीने अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा