Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

यशवंतनगरच्या जिल्हा परिषद आरोग्य जनकल्याण समितीच्या सदस्यपदी शहाजीराव माने-देशमुख यांची निवड.*

 *अकलूज प्रतिनिधी*

  *केदार --लोहकरे*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


यशवंतनगर (ता.माळशिरस) येथील जिल्हा परिषद आरोग्य जनकल्याण समितीच्या सदस्यपदी शहाजीराव माने-देशमुख यांची निवड झाली असून त्याच्यावर कौतुकाचा व अभिनंदन वर्षाव होत आहे.

              माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील परिवाराचे कट्टर समर्थक म्हणून माने-देशमुख यांची ओळख आहे.त्याच बरोबर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांचे स्नेही आहेत.तसेच विजयसिंह मोहिते-पाटील बहुउद्देशीय सेवाभावी अपंग संघटनेचे अध्यक्ष असून प्रहार संघटना माळशिरस संपर्क प्रमुख अशा अनेक पदावर कार्यरत असून दिव्यांगासाठी शासकीय योजनेतून मदत करण्याचे मोठे कार्य केले आहे.त्याच्या निवडीमुळे दिव्यांग संघटनेत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

             शहाजीराव माने-देशमुख यांनी अपंग संघटनेच्या माध्यमातून अपंगांसाठी तीन चाकी सात सायकलीचे वाटप करण्यात आले आहे.बीज भांडवल प्रकरण मंजूर करून म्हैस,गाय,शेळी,पिठाची गिरणी,मिरची कांडप मशीन,उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांना आकरा रूपये मानधन वाटप करण्यात आले.तसेच संजय गांधी योजनेतून निराधारांना दिव्यांगाना अडीच हजार अनुदान मिळवून दिले आहे.शासनाच्या नियमानुसार अपंगांना व्यवसायासाठी पंधरा हजार रूपये फाॅर्म भरून जिल्हा परिषद पाठवली आहेत.तर आमदार व खासदार फंडातून तीस लाख रूपयांची मागणी केली आहे.

            सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य जनकल्याण समितीच्या सदस्यपदावर शहाजीराव माने-देशमुख यांना कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचा माळशिरस तालुक्यात विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार व सन्मान होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा