*उपसंपादक*
*नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील सदगुरु गहिनीनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अकलूज या बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि.१९ ऑगस्ट रोजी सौभाग्य मंगल कार्यालय माळीनगर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेच्या प्रारंभी बँकेचे जेष्ठ सभासद हरिदास कांबळे यांनी श्री गहिनीनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी सभेसाठी बँकेचे चेअरमन ॲड.शिरीष फडे,व्हा.चेअरमन सन्मति सोनाज, संचालक ॲड.संजय दोशी,प्रकाश पाटील, अजित गांधी, डॉ. विठ्ठल कवितके, डॉ. मिलिंद खाडे, भरतेश वैद्य, निलेश गिरमे, डॉ. अभिजीत गांधी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे, मॅनेजर मनोज मंगरुळे,सभासद, सर्व कर्मचारी व पिग्मी एजंट उपस्थित होते.
याप्रसंगी बँकेचे चेअरमन ॲड.शिरीष ताराचंद फडे बोलताना म्हणाले की, बँकेस चालू वर्षी रुपये ४५ लाख ९७ हजार इतका नफा झाला असून सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेच्या रुपये ४४ कोटी ४ लाख इतक्या ठेवी असून २५ कोटी ४९ लाख इतके कर्जवाटप केले आहे. संस्थेचा नेट एनपीए शुन्य टक्के आहे तसेच त्यांनी सर्व सभासद आणि ठेवीदार यांच्या हितासाठी पारदर्शकतेने आणि जबाबदारीने कार्य करत राहू. बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी राज्यात नवीन शाखा उघडण्याचा आमचा मानस राहील तसेच बँकेला राज्यातच नव्हे तर देशातही अग्रगण्य बँक बनवण्यासाठी आम्ही संचालक सर्वतोपरी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.
यावेळी बँकेचे संचालक प्रकाश पाटील म्हणाले की, बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल अभिनंदन करून माळशिरस तालुक्यात सहकार क्षेत्रात बँक उत्तम प्रकारे काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक ॲड. संजय दोशी यांनी सर्व ठेवीदार व सभासद यांना विश्वास दिला की बँकेच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहील, यासाठी सर्व संचालक मंडळ प्रामाणिक व पारदर्शकपणे काम करत राहील. तसेच बँकेचे सभासद महादेव बंडगर यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी केलेल्या कार्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन बँकेचे वरिष्ठ अधिकारी संजय कुलकर्णी यांनी केले.शेवटी आभार संचालक ॲड.संजय दोशी यांनी मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा