Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

*सीना-कोळगाव भागातील मच्छिमार बांधवांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने मच्छीमार बांधवांनी मानले आभार*

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा : करमाळा विधानसभा मतदारसंघातील सीना-कोळगाव भागातील मच्छिमार व्यवसायिकांचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आमदार श्री. नारायण (आबा) पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मार्गी लागला. या कार्याबद्दल सीना-कोळगाव भागातील मच्छिमार व्यवसायिकांनी आज जेऊर येथील आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला. यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वतीने युवा नेते पै. पृथ्वीराज (भैय्या) पाटील यांनी सन्मान स्विकारला.

यावेळी मच्छिमार बांधवांनी आपल्या विविध समस्या व मागण्यांबाबत चर्चा केली. आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मच्छिमार व्यवसायिकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.

यावेळी बोलताना युवा नेते पै. पृथ्वीराज (भैय्या) पाटील यांनी, “मच्छिमार बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या माध्यमातून भविष्यातही आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. मच्छिमार बांधवांच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” असे आश्वासन दिले. तसेच यावेळी मच्छीमार बांधवांनी आमदार नारायण आबा पाटील यांचे स्वीय सहाय्यक संजय फडतरे यांचेही विशेष कौतुक केले.

मच्छिमार व्यवसायिकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने सीना-कोळगाव परिसरातील मच्छिमार बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या या प्रयत्नाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा