*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा शहरात इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने मुस्लिम सोशल वेल्फेअर संघटना या मुस्लिम संघटनेच्या वतीने वृक्षारोपण तसेच सकल मुस्लिम समाज तसेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवून पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
करमाळा शहरातील मुस्लिम सोशल वेल्फेअर या सामाजिक संघटनेने पैगंबर जयंती निमित्ताने नालबंद नगर येथील आयशा मशिद समोर वृक्षारोपण केले यावेळी कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांना मुस्लिम सोशल वेल्फेअर च्या वतीने मोफत अन्नदान करण्यात आले याचा नागरिकांनी पुरेपूर लाभ घेतला तसेच शहरातील आनंद बाग येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये देखील वृक्षारोपण करून जयंती साजरा करण्यात आली या निमित्ताने आयशा मशीद समोर एडवोकेट नईम काजी वमौलाना सय्यद अली मुजावर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच आनंद बाग मुस्लिम कब्रस्तान येथे रहिनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तसेच प्राध्यापक कलीम काजी यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मुस्लिम सोशल वेल्फेअर चे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, अजीम मोगल, फिरोज शेख,माजी नगरसेवक फारूक जमादार जाकीर वस्ताद, मौलाना मरगबुल हसन मौलाना अन्वर शेख, मौलाना अबू रेहान मौलाना सिकंदर शेख,अकबर बेग, कमरूद्दीन नालबंद, पप्पू पठाण सद्दाम शेख जुबेर सय्यद मोहसीन नालबद, फैजान शेख, नदीम बागवान,शाहरुख शेख, सादिक पठाण, सादिक काजी, पैलवान सोहेल पठाण पत्रकार नासिर कबीर अलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते
याशिवाय करमाळा शहरात सकल मुस्लिम समाज तसेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील श्रीराम प्रतिष्ठान येथे अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी नगरसेवक प्रशांत ढाळे महादेव फंड, अमोल परदेशी, युवराज चिवटे, हुमरान मुलाणी तसेच सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, मुस्तकीम पठाण, दस्तगीर पठाण, रमजान बेग इकबाल शेख शाहिद बेग याशिवाय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
एकंदर पाहता करमाळा शहरात मुस्लिम सोशल वेल्फेअर संघटना सकल मुस्लिम समाज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या सामाजिक संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा