*उपसंपादक*
*नूरजहाँ -शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
- साखर झाली महाग
साखर झाली महाग
दोन चार रुपये नाही
दुप्पट वाढला भाव
फसला इथेनॉलचा डाव.
साखर गेली इंधनात
म्हणून चहात कमी पडते
साखरेची बरणी आता गरिबाच्या कपाटात राहते.
गाड्यांचे अंग दुखायले
कंपनीचे मालक आता
बक्कळ पैसा कमवायले
जनता उपाशी मारायले.
मायलेज बसले रुसून
इंजिन दमले खोकून.
खिसा झाला रिकामा गाड्या दवाखान्यात नेवून.
गाड्या पडल्या आजारी
जनता झाली बिचारी
इथेनॉलचा घाव लागला प्रत्येकाच्या जिव्हारी .
आशेने बघतोय शेतकरी
दिस रात गळतोय घाम
वाढलं का उसाचा भाव
मिळेल का कष्टाचं दाम.
नूरजहाँ शेख
गणेशगाव




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा