डॉ. सलीम सिकंदर शेख
श्रीरामपूर
" तेरावे सद्दीची पैगंबरी खुप ! दावीतो प्रमाण कुराणातं !!
जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !
आनंद वतनी ज्योती म्हणे !! " समतेचे पुरस्कर्ते " महात्मा ज्योतिरावजी फुले .
" एक ही सफमें खडे हो गयै , मेहमूद और अयाज..,
ना कोई बंदा रहा ,ना बंदा नवाज.. ", जगप्रसिद्ध ऊर्दू कवी डॉ.मुहम्मद इक्बाल.
इतिहासाचत कित्येक महान व्यक्तींनी ज्या ज्या महामानवाच्या जीवनकार्या विषयी , सामाजिक विश्व एकता विषयावर क्रांतिकारक निर्णयावर स्तुती केली ,ज्ञातअज्ञात आपल्या कार्यात त्यांच्या विचारांचा आदर्श घेतला. अशा महामानवाची आज जयंती व पुण्यतिथी सुध्दा.
स्वतः निरक्षर असुन हीं ,अनाथ , विधवा , महिलांविषय संवेदनशील , साक्षरतेचे व समतेचा पुरस्कार करणारा पैगंबर मुहम्मद सल्लमांचां उल्लेख होणं जरुरी. पुरोगामी विचारांच्या धगधगत्या मशाली चे महामानवच . त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन कित्येक संत ,पीर , बादशहा ,महान विचारवंत , विद्वान , समाजसुधारक या महात्म्यांनी आप- आपल्या देशात समाजात ज्ञात , अज्ञात पणे क्रांती घडवून आणली .
१५०० वर्षांपूर्वी पारंपरिक रूढी वादातून धर्माची सुटका करून एकाच (ईश्वर) अल्लाहा ची शिकवण देवून " एकच अल्लाहा ( ईश्वर )समस्त ब्रम्हांडाचा नायक आहे ", एकाच अल्लाहा ईश्वराची प्रार्थना करताना अनुयायींना थेट संपर्क साधण्यासाठी मध्ये कोणत्याही दलालाची पुरोहिताची व कोणत्याही प्रकारच्या कर्मकांड करण्याची गरज नाही, कोणत्याही प्रकारची साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज नाही .
कोणताही व्यक्ती ,मग ती व्यक्ती शूद्र हीं असेल, ती सुध्दा इस्लामी ज्ञान घेवू शकते अलिम ,मौलाना , मुफ्ती , हाफीज शिक्षण घेवू शकतो .एका ठराविकच जातीत जन्माला आला तरच तुम्ही शिकण घेवु शकतात आसा पारंपरिक वाद त्यांनी एकदम नाकारला. कोणत्याही ज्ञान घेणाऱ्या व्यक्तींना पैगंबर मुहम्मद सल्लमांनी मोठे स्थान दिलेत , एक विद्वान ज्ञानी हा एका शहीदांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे , हा विचार त्यांनी दिला , ईस्लाम च्या धारनेमध्ये शहीदांनां फार मोठं महत्त्व , तरी सुद्धा त्यांनी विद्वानांना जास्त महत्त्व दिले , त्याकाळी भरपूर युद्ध होत, युध्दात बंदी केलेल्या शिक्षित सैनिकांना शिक्षा म्हणून समाजातील मुलांना शिक्षण देण्याची कामे शिक्षा म्हणून दिले जात . मग ते कोणत्याही प्रकारचे ज्ञान असो. फक्त धार्मिक ज्ञान असणं हे ईस्लाम मानत नाही, उदा. अर्थशास्त्र, रसायन, वैद्यकीय , क्रीडा , लष्कर ईत्यादी विविध क्षेत्रातील उपेक्षित वंचित समाजासाठी ज्ञानाची बंद कवाडे पैगंबर स्व.मांनी मानवजातीला कायमची अगदी खुली केली .
त्याकाळी चीन जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खुप प्रगत देश मानला जात होता, ते अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " तुम्ही चीनला जावुन तेथील ज्ञान घ्यावं लागलं, तर तुम्ही तें ज्ञान घेण्यासाठी चीनलाही जा " अशिक्षित पैगंबर मुहम्मद स्व चे पुरोगामी विचार.
श्री. गुरु नानक देवजी , आपल्या ( जन्म साखी विलायत वाला ,पेज नंबर १६८) ) मधे म्हणतात की, " ले पैगंबरी आया , इस दुनिया माहे ! नाऊ .
मोहम्मद मुस्तफा ,हो आबे परवा हे !)
( अर्थात , ज्यांचं नाव मुहम्मद आहे ,ते या जगात प्रेषित बनुन आलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकाच्या शैतानी शक्तींची भिती व भय नाही .ते बिलकुलच निर्भय आहेत .)
अल्लाह समोर सर्व मानव सम-समान, सारखेच आहेत, हा पुरोगामी विचार मांडला . ज्ञानाच्या कर्तृत्वाच्या जोरावर कोणताही व्यक्ती कितीही मोठा होवू शकतो , राजा ,वजीर प्रधान बनू शकतो, पुरोगामी विचार मांडला .राजा होण्यासाठी राजाच्याच पोटी जन्मावा लागतो हा विचारच नाहीसा करून टाकला व याचे मुर्तीमंत उदा. म्हणजे अहमदनगर ( हल्ली अहिल्यानगर )औरंगाबाद (हल्ली छत्रपती संभाजी नगर ) शहरांची ज्याने चेहरा- मोहरा बदलला व शहर वसवलं असे व्यक्तीमत्व तो एक आफ्रिकेतून निग्रो गुलाम म्हणून विकत आणला होता व नंतर आपल्या कर्तृत्वाने मोठ्या पदावर म्हणजे च पंतप्रधान पदागेला अर्थात मलिक अंबर. हा इतिहास पैगंबर मुहम्मद स्व. च्या महापरी निर्वाना नंतर 700-800 वर्षा नंतर चा.
समतेचा संदेश देणारे क्रांतिकारक प्रेषित मुहम्मद स्व नीं ,आपल्या २३ वर्षांच्या कालावधीत समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून , अरब देशात काळा -गोरा हा भेदभाव खुप मोठ्या प्रमाणात अतोनात प्रकारे अस्तित्वात होता , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात केली जात होती ,ती गुलामगिरी नष्ट करून एका जैद नावाच्या काळया गुलामाचा आपल्या सख्ख्या आत्या बहीणाचा विवाह करून काळया -गोरयांचा भेदभावच नष्ट केला .
ह.बिलाल नावाच्या त्याकाळी तुच्छ समजले जाणारे, त्यांना गुलामगिरीतून मुक्त करून . मक्का विजयाच्या दिवशी काबागृहावर चढून " अजान " देण्याचा आदेश देत समस्त जगाला दाखवून दिले की , जगात कोणीही अपवित्र नाहीं,
समस्त सर्व मानव जात ही एकाच अल्लाहाची संतान आहेत. सर्व रंगाचे , वर्णाचे , वंशाचे ,एकच आहेत .हा भेदभाव ईस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय , हक्क आहेत ," क्रांतिकारी विचार पहिल्यांदा पैगंबर मुहम्मद स्व.नीं जगाला स्व आचरणातून सिद्ध केला.
स्वामी विवेकानंद म्हणतात ,""' प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व.आपल्या आदर्शवत जीवनात असं काही धडा घालून गेले की ,त्यांच्या अनुयायांनी , मुस्लिमांमध्ये संपूर्ण समता , बंधुभाव निरंतर नांदावयांस हवे , त्यांच्या मधे जातीचा , लिंगाचा , वर्णभेदाचा भेदभाव कदापी ही शिरू नये."
पैगंबर मुह्म्मद स्व. नीं सांगितले, जगातील प्रत्येक व्यक्ती हीं एकाच आदम व हव्वा ची लेकरं आहेत, कोणीच उच्चं निचं नाहीत,सर्व एकमेकांचे बंधू बंधू आहेत. एकच आहेत "
" एक हीं सफ में खडे हैं..मेहमूद और आयाज...
नां कोयी रहा बंदा.. और नां कोयी बंदा नवाज.. "
लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर
९२७१६४००१४...






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा