Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

*मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन*

 *मंगरुळ --प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



मंगरूळ ता.तुळजापूर येथील  संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत दिनांक १ ऑगस्ट २०२६  रोजी साहित्यरत्न 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' यांची जयंती व 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली या जयंती व पुण्यतिथीनिमित्त. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आश्रम शाळेच्या वतीने  विनम्र अभिवादन करण्यात आले     


                   याप्रसंगी विद्यार्थ्यांना लेखनात चालना मिळावी म्हणून व  "लेखन प्रेरणा दिनानिमित्त"आश्रम शाळेत  विद्यार्थ्यांच्या निबंध लेखन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला 

याप्रसंगी संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा