*अकलूज प्रतिनिधी*
*केदार --लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
गुरूजनांच्या सन्माना बरोबर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.
अकलूज येथे श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थिनी गुरूजनांच्या सन्माना बरोबर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ.सौ. जयशीला मनोहर आषाढी पौर्णिमेचे महत्त्व सांगताना आषाढी पौर्णिमा हा दिवस जगामध्ये तथागत गौतम बुद्ध त्यांच्याशी संबंधित अतिशय पवित्र दिवस म्हणून साजरा केला जातो.तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर याच दिवशी सारनाथ येथे इसीपतनच्या मृगदायी वनात आपल्या पाच शिष्यांना उपदेश दिला होता. म्हणून आषाढी पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.या कार्यक्रमानिमित्त कु. सईराणी रोकडे,कु.कृतिका सोनवणे,कु.दिपाली खांडेकर, कु.श्रेया दळवी,कु.करिष्मा पालवे,कु.अंजली राऊत या विद्यार्थिनी आपली मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमित घाडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की,शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, सकारात्मक विचार व गुरूजनांचे आशिर्वाद यामुळेच विद्यार्थिनींचे भवितव्य घडत असते.त्याच बरोबर गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.गुरुपौर्णिमेनिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.राजनंदिनी इंगवले देशमुख व कु.अर्पिता कोळी हिने केले.तसेच आभार प्रदर्शन कु.मोनाली इंगवले-देशमुख हिने केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता महाविद्यालयाचे डॉ.ऋषी गजभिये,डॉ.भारती भोसले,डॉ.छाया भिसे,डॉ.राजश्री निंभोरकर,नाना साठे,दीपक शिंदे,रमजान शेख यांनी परिश्रम घेतले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा