*अकलूज-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी लासुर्णे जिल्हा पुणे सकाळी 11 वाजता व्याख्यानमालेत बोलताना साहित्यिक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड बोलताना म्हणाले
" नागपूरच्या लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज हजर होते अण्णाभाऊंचा शाहिरी कार्यक्रम संपल्यानंतर ते व्यासपीठावरती आले हातात माईक घेऊन राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज म्हणाले " आपण सर्वजण मेलेल्या मढयासाठी रडतो पण लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि त्यांचे सहकारी यांनी जिवंत मढ्यासाठी टाहो फोडला आहे, जे उद्या मरणार आहेत त्यांना आज वाचवा त्यांनी साद घातली आहे अण्णाभाऊ कमी शिकलेले असून सुद्धा सरस्वती देवी त्यांना प्रसन्न आहे ते प्रतिभावंत आहे खरी कला झोपडीत जन्माला येते मोठमोठ्या बंगल्यात तर दुसऱ्यांचं रक्त पिणारे ढेकूणच जन्माला येतात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि त्यांचे सहकारी ज्या गावात येतील त्या गावात त्यांचं स्वागत करा "
मुंबई येथे अण्णाभाऊंच्या शाहिरी कार्यक्रमास राष्ट्रीय संत गाडगे महाराज उपस्थित होते अण्णाभाऊंचा पोवाडा ऐकला संत गाडगे महाराज अण्णाभाऊंना भेटले आणि म्हणाले " अण्णाभाऊ तुमच्या शाहीरी पोवाडा मध्ये समाज परिवर्तनाची ताकद आहे " संत गाडगे महाराजांनी अण्णाभाऊंच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकली.
यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना शासनाकडून फ्लॅट दिला होता तीनशे रुपये पेन्शन सुरू केली होती मात्र अण्णाभाऊ साठे यशवंतराव चव्हाण यांना म्हणाले होते " जो कलावंत, साहित्यिक जनतेकडे पाठ फिरवतो जनता त्याच्याकडे पाठ फिरवते मी फ्लॅटमध्ये राहायला जाणार नाही इथेच चिराग नगरच्या चाळीमध्ये राहणार अण्णाभाऊ आयुष्यभर शेवटपर्यंत त्यात चाळी मध्येच राहिले .
2022 मध्ये रशियाच्या पुष्किन विद्यापीठात अण्णाभाऊंच्या साहित्यावरती विचारवंतांची परिषद भरली होती अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगातील 27 भाषेमध्ये अनुवादित झाल आहे. अण्णाभाऊ साठे हे जागतिक पातळीवरील साहित्यिक आहेत . महात्मा फुले सावित्रीबाई फुले तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्रातील खासदाराच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन सुद्धा दिला आहे . अण्णाभाऊंना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा दिला पाहिजे,"
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमोद गायकवाड यांनी केले आभार अमोल गायकवाड यांनी मांडले सदर कार्यक्रमास गावचे सरपंच सागर पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा