*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
बावडा नरसिंहपूर मार्गावरील भाऊसाहेब नगर (सिनगरवडा) येथे लाकडाने भरलेला महिंद्रा पिकअप सुझूकी व्हिक्टोरिया गाडीवर पडून अपघात झाला. परंतू दैव बलवत्तर म्हणून अपघातातील पाच जणांचे प्राण वाचल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग अजून किती जणांचे प्राण जाण्याची वाट बघत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
बावडा नरसिंहपूर मार्गावरील भाऊसाहेब नगर (सिनगरवडा) येथे सुनील महादेव हांगे ( भोडणी) यांचा लाकडाने भरलेला महिंद्रा पिकअप टेम्पो क्रमांक MH-45-AF-4208 नरसिंहपूर बाजूकडून बावड्याकडे चालला असता भाऊसाहेबनगर येथे झोले मारत आला असता बावडा कडून नरसिंहपूरकडे चाललेली सचिन जाधव (टेंभुर्णी) यांची सुझूकी व्हिक्टोरिया क्रमांक MH-45-BD-4743 गाडीवर पडून अपघात झाला. यामधील ड्रायव्हर सहीत पाच जणांचे प्राण वाचल्याची भावना प्रत्यक्ष दर्शिंनी बोलून दाखवली.
दरम्यान बावडा दुरक्षेत्रचे पोलीसांनी सदर ठिकाणी येवून दोन्ही अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा केला. तसेच जेसिबीच्या सहाय्याने लाकडाने भरलेला महिंद्रा पिकअप टेम्पो उचलून बाजूला काढला. तर रस्त्यावर पडलेली लाकडेही बाजूला काढली. परंतू सुझूकी व्हिक्टोरिया गाडीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होवूनही त्यातील एक जणाचा ओठाला मार लागला असून चालकाला डोक्याला मार लागला आहे. दैव बलवत्तर म्हणून आज प्राण वाचल्याची भावना त्यांच्या मनात दिसून आली.
बावडा नरसिंहपूर मार्गावरील भाऊसाहेब नगर (सिनगरवडा) येथील ठिकाणी सतत पणाने अपघात होतात. परंतू सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी कोणत्याही प्रकारचा माहिती फलक लावलेला नाही. तसेच सुरक्षेसाठीची मानके असणारे फलकही लावलेले नाहीत. या ठिकाणासह बावडा नरसिंहपूर मार्गावर गतीरोधक, माहिती फलक लावलेले नसल्याने अपघात होवून जवळपास तेरा जणांना प्राण गमवावा लागला आहे. तरीसुद्धा सांगली बांधकाम विभागाचे कर्मचारी, अधिकारी व ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
चौकट - सदरच्या अपघातग्रस्त ठिकाणासह बावडा नरसिंहपूर मार्गावर गतिरोधक बसवावे अशी मागणी डॉ. शहाजी शिंदे, भाजपाचे आयुष्यमान समितीचे तालुका अध्यक्ष नागेश गायकवाड, राहुल बागल, विक्रम मोहिते, बच्चन मिस्त्री, प्रताप जाधव, केशव बोडके, शशिकांत सुर्यवंशी, वसंत तावरे, बापू शिंदे आदिंनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे याकडे गांभीर्याने बघतील का?
फोटो - बावडा नरसिंहपूर मार्गावर भाऊसाहेब नगर (सिनगरवडा) येथे अपघातग्रस्त वाहने.
------------------------------------------------------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा