Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

कालठणला औट‌‌‌ घटकेचा राजा श्रीयाळसेठ उत्सव जल्लोषात साजरा.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159


इंदापूर तालुक्यातील मौजे कालठण क्रमांक एक येथे औट घटकेचा राजा श्रीयाळसेठ नवसाचा उत्सव कै. लक्ष्मीबाई क्षीरसागर व  जगन्नाथ क्षीरसागर यांच्या निवासस्थानी तर मानाचा कै. देवीदास पाटील यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

माजी सरपंच अर्जुन कुंभार व महादेव कुंभार यांनी 

तयार केलेल्या श्रीयाळसेठ याच्या मिरवणुकीचा मान बाळासाहेब मांढरे व  बबन मांढरे यांना प्रथेप्रमाणे मिळाला. ही सवाद्य मिरवणुक एक तास चालली.

 यावेळी भाविकांनी  इडा पिडा टळु दे बळी चे राज्य येऊ दे अशी प्रार्थना केली. कै. लक्ष्मीबाई चरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हळदी कुंकू पान

सुपारी, उत्सव गीत, फुगडी, महाप्रसादाचे  आयोजन करण्यात आले होते.

नाभिक समाजाच्या वतीने नागपंचमीच्या दिवशी दोन फुटांपर्यंत नाग देवतेची प्रतिमा तयार करून त्याची पूजा करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन रामचंद्र पांडुळे, साहेबराव पांडुळे, जोतिराम पांडुळे, तुकाराम पांडुळे यांनी केले.

 श्रीयाळसेठ उत्सव मिरवणूकीत बापू पाडुळे, दत्तात्रय मदने, संजय माने, दादासाहेब गलांडे, तुकाराम पांडुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 श्रीयाळसेठ उत्सव यशस्वीतेसाठी सुजित पाटील, धनाजी पाटील, प्रसाद पाटील, वसंतराव पाटील, उत्तम पाटील, दादासाहेब क्षीरसागर, बाळासाहेब क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, संतोष क्षीरसागर व कुटुंबीयांनी प्रयत्न केले.

यासंदर्भात नितीन क्षीरसागर म्हणाले,

सलग बारा वर्षे दुष्काळ पडल्यानंतर जनतेच्या कल्याणासाठी शिवभक्त श्रीयाळ सेठ यांनी अन्नधान्य व संपत्ती जनतेला खुली केली. ही

दानशूरता पाहून आदीलशहाने त्यांना औट घटकेचा राजा केले. औट घटकेत हर्षोल्लासाने श्रीयाळसेठचा शेवट झाला. यावेळी जनतेची कामे मार्गी लागली म्हणून हा दिवस 

शुद्ध श्रावण षष्ठी अर्थात श्रीयाळ सेठ उत्सव साजरा  करण्याची प्रथा

प्रथम शहरी व ग्रामीण भागात आजही सुरू असल्याची आख्यायिका आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा