*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सालसे ता करमाळा येथील मंडल अधिकारी यांची तक्रारीवरून चौकशी करण्याचे आश्वासन करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिल्यानंतर मागील तीन दिवसांपासून कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले कार्यकर्ते नागनाथ वाघमारे यांचे उपोषण मागे घेण्यात आले.
मौजे निमगाव (ह.), ता. करमाळा येथील गट क्रमांक ११९/२अ/१ मधील शेताच्या बांधाच्या हद्दीच्या खुणा कायम करण्याचा आदेश देणे व संबंधित प्रकरणाची पुढील तारीख वाढवून देण्यासाठी सालसे येथील मंडल अधिकारी यांचा अहवाल घेऊन चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिले व वाघमारे यांच्या निमगाव ह येथील गट क्रमांक ११९/२अ/१ येथून बांधावरुन रस्ता करण्याचा आदेश असताना दलीत समाजातील शेतकऱ्याचे शेतातील अर्धा ते पाऊण एकर ऊस पिकात अप्पा वासुदेव शिंदे यांनी साथीदारांसह ट्रॅक्टर घालून नुकसान केल्याप्रकरणी त्यांचेवर ॲट्रॉसिटी कायदा व मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणीसाठी सोमवारी दि १७ रोजी शिष्टमंडळाने करमाळा विभागाच्या पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांची भेट घेतली होती.यावेळी अंजना कृष्णा यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन उपस्थित शिष्टमंडळाला दिले.बहुजन संघर्ष समितीचे नागनाथ वाघमारे यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून उपोषण सुरू केले होते.ते उपोषण तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे उपस्थितीत सोडण्यात आले.लहुजी शक्ती सेनेचेसंघटक संजय कदम, मातंग एकता आंदोलन चे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे,मार्केट कमीटीचे संचालक बाळासाहेब पवार,अरुण जगताप, नितीन शिंदे, मातंग एकता आंदोलन चे जिल्हा उपाध्यक्ष रतन शिंदे,करमाळा तालुकाध्यक्ष शरद पवार,रणजित कांबळे,राज कांबळे,ऒम कांबळे,सतीश जगताप,गणेश कारंडे,प्रवीण आबा जाधव, नगरसेवक करमाळा, नानासाहेब नीळ सर, निमगाव ह,शिरीराम नीळ, विश्वनाथ परबत चेअरमन तडवळे अध्यक्ष बहुजन संघर्ष समिती सोलापूर जिल्हा, भगवंत ढेरे, पांडुरंग ढेरे, अशोक परबत,गणेश कदम.आदिजण उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा