*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
मनोहर भोसले प्रकरणात कुडूवाडी पोलीस ठाणे गुरनं 192/2026 बीएनएस 318(2), 318(4), 3(5) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांचा प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम 3(2),3(3) प्रमाणे वाढीव बीएनएस कलम 111 (2)ब, इतर कलमान्वये दिनांक 23/04/2026 रोजी गुन्हा दाखल आहे
सदर गुन्हयातील मुख्य आरोपी मनोहर चंद्रकांत भोसले व त्याचे इतर साथिदार यांचेवर सोलापूर ग्रामीण जिल्हयात एकूण 06 गुन्हे दाखल झाले आहेत. सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी सदर गुन्हयाचे तपासाकरीता सोलापूर ग्रामीण घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. सदर एस.आय.टी पथकाने गुन्हयात सहभाग असणारे एकूण 24 आरोपी निष्पन्न केले आहेत.
या गुन्हयात दत्तकला इनस्टिटयूट (शिक्षण संस्था), स्वामी चिंचोली, ता. दौंड, जिल्हा पुणे चे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचा मनोहर भोसले यास प्राप्त झालेल्या अवैध पैशाची विल्हेवाट लावण्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांना मदत करणारे संस्थेमधील आरोपी नामे राजेंद्र गोकुळ हुंबे यास दिनांक 11/08/2026 रोजी व, लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यास दिनांक 13/08/2026 रोजी यांना अटक करण्यात आली होती. त्यांची आज दिनांक 17/08/2026 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर होती. सदर गुन्हयाचा सविस्तर तपास करीत असताना, रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांचा देखील सदर गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक 16/08/2026 रोजी अटक केली होती आज रोजी सदर तिन्ही आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली असता त्यांना दिनांक 21/08/2026 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयातील आरोपी रामदास झोळ हा परागंदा असून त्याचे शोधासाठी पथके रवाना झाली असून त्याचा शोध सुरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास विशेष तपास पथक करीत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा