Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

*१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पुजारीनगर तुळजापूर येथे वृक्षारोपण*

 *मुख्य संपादक*-

*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो:-9730867448*


भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी . कीर्ती किरण पुजार  यांच्या 'एक पेड माँ के नाम ' या मोहिमेअंतर्गत आणि वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याने भविष्याची गरज ओळखून 'पुजारीनगर तुळजापूर 'येथील नागरिकांनी  वृक्षारोपण करण्याचे ध्येय बाळगून हा उपक्रम राबवला 

पुजारीनगर मधील वंश लॉन्सच्या ओपन स्पेस वर श्रीनाथ मंगलकार्यालयाचे मालक  विश्वनाथदादा पुजारी यांचे संकल्पनेतून जवळपास 100 वृक्ष लावण्यात आले, यामध्ये आंबा, चिंच, पेरू, आवळा, जांभूळ, वड, सीताफळ, रामफळ, कडुलिंब इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली,                                     या प्रसंगी पुजारीनगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, सतीश खोपडे सर, समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, मुंबई पोलीस महावीर शिंदे, दै. पुण्यनगरीचे पत्रकार उमाजीअप्पा गायकवाड, प्रणव देवकते, अमोल गोसावी, अध्यक्ष विशाल शिंदे, व सहकारी उपस्थित होते, विशेष बाब म्हणजे दिवसाचे 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या 4 वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा