Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत/नुकसानभरपाई द्यावी-- मा. आमदार ज्ञानराज चौगुले यांची मागणी

 मुख्य संपादक 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9730867448


पावसाअभावी सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत/नुकसानभरपाई . घ्यावी अशी मागणी उमरगा लोहारा मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज धोंडीबा चौगुले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे


याबाबत सविस्तर मागणी अशी सोयाबीन हे धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक असून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मात्र, यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने तसेच पावसात मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाची अपेक्षित वाढ झालेली नसून अनेक भागांमध्ये पिके करपून गेली आहेत.

शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत व इतर बाबींवर मोठ्या

प्रमाणात खर्च केला आहे. त्यामुळे उत्पादनचं हाती येणार नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.

तरी पावसाअभावी नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचे गावनिहाय व शेतनिहाय तातडीने पंचनामे करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, ही नम्र विनंती.


आपला नम्र,

(ज्ञानराज धोंडीराम चौगुले,) मा. विधानसभा सदस्य.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा