Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३० ऑगस्ट, २०२६

कुर्दुवाडी रेल्वे अपघातातील बचावकार्याचे प्रात्यक्षिक सादर करताना रेल्वे कर्मचारी व एनडीआरएफचे जवान.

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


कुडुवाडी : अपघातग्रस्त झालेल्या रेल्वेचा डबा वरून फोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक एनडीआरएफच्या जवानांनी कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर प्रात्यक्षिक सादर केले



रेल्वेला अपघात होऊन आग लागली किंवा इतर कोणत्याही मोठ्या दुर्घटनेच्या वेळी प्रवाशांना वाचवण्यासाठी बचावकार्य किती वेगाने आणि प्रभावीपणे केले जाऊ शकते, याची चाचणी घेण्यासाठी कुडूवाडी रेल्वे विभागातर्फे मॉक ड्रिल घेण्यात आले.



रेल्वे वर्कशॉप समोरील विश्रामगृहाच्या मागे असलेल्या रेल्वे लाईनवर सदरचे मॉक ड्रिल करण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये राष्ट्रीय आपत्ती मोचन एनडीआरएफची टीम स्थानिक, अग्निशामक दल, जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय पथकाने


एकत्र येऊन समन्वय साधला. वास्तविक, अपघात घडल्यास मदतकार्य कसे सुरू करावे, याचे हुबेहूब दृश्य किंवा कृत्रिम परिस्थिती निर्माण करून सराव करण्यात आला.


यावेळी सोलापूर मंडलचे प्रबंधक डॉ सुजित मिश्रा, वाणिज्य प्रबंधक जयदीप प्रदक्षिणे, ऑपरेटिंग मॅनेजर मनोज तिरके, सुरक्षा अधिकारी ज्वेल मेकॅन्जी, पार्सल सुपरवायझर धम्मदीप ओहोळ, डी आर यु सी सी मेंबर सोलापूर डिव्हिजन  प्रदीप पवार, 

 रेल्वे सल्लागार समिती सदस्य सागर शर्मा, विनायक पाटील कुर्डूवाडी अमरकुमार मानेसह मोठ्या संख्येने रेल्वेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा