*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना भेटुन एक निवेदन दिले आहे व या निवेदनाद्वारे त्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना विकला जाऊ नये ही प्रमुख मागणी केली आहे
. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या भुमिकेचे आमदार नारायण आबा पाटील गट स्वागतच करत असुन त्यांच्या भुमिकेशी मिळतीजुळती भुमिका आमदार नारायण आबा पाटील यांची सुध्दा आहे. आदिनाथ कारखाना जर कोणी विकत घेऊन चालवू पाहत असेल तर वेळप्रसंगी मोठे आंदोलन करु व रक्त सांडण्याची वेळ आली तरी बेहत्तर अशी ठाम भूमिका आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली आहे. करमाळा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या समान इतर सर्व संघटना व विविध राजकीय गटांनीही या भुमिकेस समर्थन द्यावे असे आवाहन परत एकदा पाटील गटाकडून प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले.
याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावर चालवण्यास आमदार नारायण आबा पाटील यांनी प्राधान्य दिले आहे. परंतु आर्थिक मदत तेवढ्या प्रमाणात नाही मिळाली तर भाडेपट्टा तत्वावर सुध्दा हा कारखाना चालवण्यास दिला जाईल परंतु कदापिही या कारखान्याचे मालकी हक्क इतरांना दिले जाणार नाहीत ही आमदार तथा चेअरमन नारायण आबा पाटील व समस्त संचालक मंडळानी यापुर्वीच ठामपणे सांगितले आहे. विशेष म्हणजे आदिनाथ कारखान्याचे संचालक डॉ अमोल घाडगे यांनी तर काही व्हायचं ते होऊ द्या, वेळप्रसंगी कोणत्याही प्रसंगास सामोरे जाऊ पण आदिनाथचा लिलाव होऊ देणार नाही असे ठामपणे सांगितले आहे. तर आदिनाथचे जेष्ठ संचालक डॉ हरीदास केवारे, व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील तसेच संचालक राहुल सावंत हे सध्या आदिनाथ कारखान्याकडून न्यायालयात चालू असलेल्या लढाईसाठी अवारतपणे सहभागी आहेत. सर्व संचालक मंडळ हे आमदार नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं घेतलेली भुमिका ही स्वागतार्ह आहे. आदिनाथ चालवण्यासाठी अनेकजण आमदार नारायण आबा पाटील यांची भेट घेऊन मागणी करत आहेत.
स्वतः आमदार नारायण आबा पाटील हे सर्व संचालक मंडळासमोर भाडेपट्टा करारावर घेऊ पाहणाऱ्याबरोबर सर्वसमक्ष चर्चा करत आहेत. यामुळे करमाळा तालुक्यातील जर कोणी सधन शेतकऱ्यांची मुले अथवा व्यापारी हे सामुहिक पणे कारखाना चालविण्यास इच्छुक असतील तर त्यांचेशी सुध्दा आमदार नारायण आबा पाटील व संचालक मंडळ अवश्य चर्चा करेल. यामुळे आदिनाथ कारखान्याच्या संक्रमणाच्या काळात आदिनाथच्या बाजूने कोण कोण उभा रहात आहे याच नोंद सभासद अवश्य ठेवत असल्याचे तळेकर यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील इतर राजकीय गटांनी आदिनाथ बाबत अजुनही आपली भुमिका का मांडली नाही असा खडा सवाल प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा