Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

लोकमान्य टिळक जयंती निमित्त शेगाव, बुलढाणा येथे महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार वितरण सोहळ्यात पुणेकर ह.भ.प . रामायणाचार्य डॉ. श्री. संजय गिते यांना महाराष्ट्र लोक नायक पुरस्कार प्रदान.

 पुणे, श्रमण संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी पुणे


जिल्ह्यातील रुपी नगर येथील रहिवासी डॉ. संजय सिताराम गीते यांना साहित्य, संगीत, योग व सामाजिक कार्य, अध्यात्मिक कार्या बद्दल महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. डॉ. संजय गिते  गेली ४५ वर्षे साहित्य, संगीत, योग व आध्यात्मिक, सामाजिक कार्यामध्ये योगदान देत आहेत.  स्वतःचे व समाजाचे ज्ञान विकसीत करण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.  त्यांच्या अनेक साहित्य कृती प्रकाशित असून ते संगीत रामायण कथा वाचक आहेत. हरिनाम सप्ताह मध्ये संगीत रामायण व गीत रामायणाचे कार्यक्रम सादर करत ते समाजाची सेवा करतात. अहिल्यानगर मधील जामखेड तालुक्यातील पेन्शनर शिक्षक संघटनेचे ते अध्यक्ष असून वयोवृद्ध शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवून ते सामाजिक सेवा सुद्धा करत आहेत. केवळ शिक्षकांच्याच नव्हे तर अनेक सामान्य नागरिकांच्याही समस्या सरकार - दरबारी  मांडून ते सोडवतात.  त्याचप्रमाणे योगाचे शिबिरे घेत योगा आणि मानवी जीवन यावरती अनेक व्याख्याने ते देत आहेत. मानवी जीवनामध्ये योगाचे  अनन्यसाधारण महत्त्व ते व्याख्यानांमधून, शिबीरांमधून पटवून देतात. विज्ञान व योग विज्ञान यातील सूक्ष्म संबंध व्याख्यान व्दारे ते प्रतिपादित करतात.  या कार्याची दखल घेत लोक युवा वृत्तपत्राच्या वर्धापन दिनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जिल्हा बुलढाणा यांनी त्यांना "लोकनायक" हा पुरस्कार बहाल केला आहे.


 हिंदी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य द्वारा लोक युवा वृत्तपत्र व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच दैनिक लोक युवा वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र "लोकनायक" पुरस्कार २०२६ चे आयोजन संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव येथे करण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाईन मागविण्यात आले होते.         


                                    यावेळी ६२८ प्रस्तावा पैकी निवड करून १२५ मान्यवरांना राज्यस्तरीय महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी धनश्रीताई काटीकर पाटील या होत्या. हिंदी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष   विजय कुलकर्णी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  त्यांच्या हस्ते डॉ. संजय गिते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा जिल्हा प्रतिनिधी तरुण भारत चे चंद्रकांत गोराडे व शहर अध्यक्ष भाजपचे बाळासाहेब दामोदर उद्योजक हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व संत गजानन महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, विधिज्ञ - वकील, उद्योजक, अभिनय,साहित्य, योग, संगीत,आध्यात्मिक आदी विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा  महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल केसकर सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.

चौकट : यावेळी देश सेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा देखील  सत्कार करण्यात आला. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नागरिकांच्या समस्यांना बोलते करणारे लेखनी समशेर सम्राट, पत्रकार बांधवांचा देखील  सत्कार लोकमान्य टिळक जयंती निमित्त करण्यात आला. यावेळी लोककला, भजनी मंडळ व वारकरी बांधवांचा देखील सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा