Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

फसव्या योजनांचे गाजर दाखवून निवडून आलेल्या माहायुती सरकारला राज्यातील जनता सत्तेतुन पाय उतार करणार--सौ. सरस्वती घोड़के

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*



गेल्या काही वर्षांमध्ये भाजपचा आणि महायुती मधील घटक पक्षांचे मतांची टक्केवारी कमालीची घसरलेली होती. 

हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महायुती सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील मतदारांना लालच म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचप्रमाणे ज्येष्ठांना एसटीमध्ये मोफत प्रवास व महिलांना हाफ तिकीट आशा मतदाराना आपलेसे करण्यासाठी तात्पुरत्या फसव्या योजना सुरू केल्या.योजना सुरू करताना मोठमोठे आश्वासन देण्यात आली महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या सर्वच स्तरातल्या महिला पात्र असतील अशा घोषणा केल्या यामुळे राज्यातील लाखो महिलांनी या योजने साठी कागदपत्र

जमा केली यात अपवाद् काही महिला वगळता ९०% महिला कोणत्या ही अटी शरती न लावता पात्र करन्यात आल्या व ऐन निवडणुकीचे काळात पत्येक महिलेचे बँक अकाउंटला १५०० जमा करम्यात आले.. पुढे इलेक्शन होऊन निवडून येई पर्यन्त .. या योजनेचा एकही हप्ता थकू न देता प्रत्येक महिन्याला महिलांना दीड हजार रुपये देण्यात आले .निवडणुका झाल्या महायुती सरकार सत्तेत आले  सरकार स्थापन झालं..एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्याचा शपथ विधी झाला .खाते वाटप झाले एवढे झाल्यानंतर मात्र या सरकारने पहिला मोर्चा लाडकी बहीण योजनेकडे वळवला आणि पुन्हा जाहीर केलं की लाडकी बहीण योजनेत अनेक  बोगस खाती आहेत हे कारण पूढे करत महिलाना जाचक नियम अटी घालून पुन्हा केवायसी करण्याचे आदेश दिले ..व यामध्ये जास्तीत जास्त  जाचक आटी  लावण्यात आल्या निवडणुकी पूर्वी दिलेलि आश्वासन न पाळता नवीन केवायासि कारायला लावून ९०% पैकी ७० % महिलांना या योजनेतून् वेगवेगळे निकष लावून आपात्र करण्यात आले ..

यात कित्येक गरजु महिलांचा कागतपत्रा चे जाचक अटी मुळेलाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आलायानंतर लगेच एसटी महामंडळाकडून महिलांना आणि ज्येष्ठांना देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ् कमी करत 

एस टी , महामंडळाकडून मोफत व अर्ध टिकिटातील सवलतीसाठी स्मार्ट कार्ड ची सकती करण्यात आली याचा लाभ घेणाऱ्या ।राज्यातिल् लाखो प्रवाशी लाभार्थ्याना पुन्हा के वाय सी करण्यात भाग पाडले व चार्जेबल स्मार्ट कार्ड सुरु केले यासाठी हे कार्ड ला महिन्याला ९९ रुपया चे रिचार्ज करण्याचि आट घालण्यात आली स्मार्ट कार्ड ला दर महा ९९ रुपयाचे रिचार्ज  नहीं केले तरज्येष्ठांना व महिलांनाफुकट किंवा हाफ तिकीट वर प्रवास करता येणार नाही असा कडक नियम करण्यात आला आहे..

२०१४पासून या महायुती सरकारने फक्त जुमलेबाजी करू निवडणुकीपूर्ती जमलेबाजी करून निवडणुका जिंकलेल्या आहेत हे आज प्रत्येक नागरिकाच्या लक्षात येत आहे शेतकरी पिक विमा संरक्षण चा प्रचंड घोटाळा झालेला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना लाईट फुकट देऊ घरगुती लाईट  वापरणाऱ्यांना वीज दरात सवलत देऊ..अशा निवडून येण्यापुरत्या वावड्या उठवल्या व सत्ता आल्यानंतर मात्र या सगळे योजनांना केराची टोपली दाखवून राज्यातील नागरिकांची सपशेल फसवणूक केलेले आहे.

त्याचप्रमाणे पेपर फुटी प्रकरणे, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव, घरगुती गॅस घरातील वाढ, इथेलान मिश्रित पेट्रोल,डिज़ल मुळे होणारे वाहनांचे नुकसान प्रत्येक वस्तूवरील जीएसटी चा वाढता टॅक्स , शैक्षणिक क्षेत्राचे नुकसान आशा एक ना अनेक गोष्टींमुळे.महाराष्ट्र राज्यातील नागरिकांमध्ये महायुती सरकार विषय मनात तीव्र असंतोष निर्माण झालेला असून

येणाऱ्या २०२९ ला महायुती सरकारचा सुपडा साफ केल्याशिवाय राज्यातील जनता शांत बसणार नाहीं.अशि तीखट भावना कर्जत मिरजगाव येथील महिला आघाडीच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या  सौ सरस्वती घोडके यांनी व्यक्त केलेली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा