Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चिखलठाण येथील ग्रामस्थांनी साडेसातशे माध्यमिक विद्यार्थ्यांचा सन्मान करीत दिले मिष्टांन भोजन Head

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


 गावातील जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी चिखलठाण तालुका करमाळा येथील तरुण पिढी सरसावली असून शाळेचा पट  वाढवण्यासाठी विविध सुविधा निर्माण करत शिक्षकांच्या मदतीने वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत.  यावर्षी स्वातंत्र्यदिनादिवसी विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करत कार्यक्रमानंतर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमीक शाळेतील साडेसातशे विद्यार्थ्यांना    मिष्टान्न भोजन देत स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.

सध्या अनेक गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या कमी होऊ लागली असून भविष्यात अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अशा वेळी चिखलठाण  गावातील तरुणांनी जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असून शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जात असून शाळेचा अडचणी सोडवत शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले  जात आहे. येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत लगस यांनी स्वतः पाठीवर पंप घेऊन शाळा परिसरात निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य दूर केले असून प्रत्येक वर्षी शाळेत मुलांना खाऊ वाटप केला जात असे परंतु यावर्षी त्यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे विशाल लोहार सुनील पवार नितीन पाटील अक्षय अंकुशे यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. यासाठी बिबिशन कळसाईत शेखर पोळ अरुण पोळ हासाब भांडी  सेंटर यांनी विशेष सहकार्य केले यावेळी शालेय स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला शिक्षक नवनाथ मारकड  सुनील गलांडे राजू लोंढे केंद्रप्रमुख गुळवे यांच्यासह मुख्याध्यापक एस एम वाघमारे कामटे मॅडम गलांडे मॅडम सचिन गव्हाणे सुनील कुचेकर अमोल नितीन महाराज अमोल महाराज चैतन्य श्री माळ यांच्यासह सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा