Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

*धनेगाव येथील सुरवसे कुटुंबावर कोसळला. दु:खाचा डोंगर सात दिवसांच्या अंतराने पती पत्नीचे निधन*

 *मुख्यसंपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


धनेगाव ता.तुळजापूर येथील यमुनाबाई ज्ञानोबा सुरवसे यांचे दि.१६ ऑगस्ट २०२६ रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले मृत्यू समयी ते ८० वर्षांचे होते त्यांच्या पश्चात  २  मुले २  मुली सुना जावई नातवंडे असा परिवार असून दि.१६ ऑगस्ट   २०२६ रोजी धनेगाव येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात      


 

    दुःखद बाब म्हणजे ९ऑगस्ट२०२६ रोजी यमुनाबाई सुरवसे  यांचे पती ज्ञानोबा सूर्यवसे‌ यांचे  निधन झाले यांच्या निधनानंतर सातव्या दिवशी यांच्या पत्नी यमुनाबाई सुरवसे यांचे निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सात दिवसात या कुटुंबातील आई-वडिलांचे हरपल्याने सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे


       त्यांच्या अंत्यविधीत हजारोंच्या संख्येने  सुरवसे परिवारावर प्रेम करणारे नागरिक सहभागी झाले होते    धनेगाव येथील माजी सरपंच, अर्जुन ज्ञानोबा सुरवसे व तुळजापूर येथील सैनिक शाळेतील शिक्षक भीमराव ज्ञानोबा सुरवसे यांचे त्या आई‌ होत्या तर कुंभारी येथील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ वडणे आणि सोलापूर येथील एस एम टी चे सेवानिवृत्त वाहक प्रकाश सुपाते यांचे त्या सासुबाई होत्या 


"टाइम्स 45 न्यूज मराठी" चॅनेल टीमच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा